मुंबई, दि. १८ ऑगस्ट – नाना पटोले यांनी आपली स्वतःची पहिली उंची वाढवावी. केवळ शारीरिक उंची वाढवून चालणार नाही तर वैचारिक उंचीही वाढली पाहिजे. पंतप्रधान यांच्यावर टीका करण्याइतपत नाना पटोले यांनी आपले कर्तृत्व आणि क्षमता तयार करण्यासाठी वेळ घालवावा आणि मगच त्यांनी त्या क्षमतेनुसार भाष्य करावे, असा पलटवार विधान परिषदेचे विरोधी पक्षेनेते प्रविण दरेकर यांनी नाना पाटोले यांच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केलेल्या टीकेवर केला.
‘कोरोना काळात लसी दुसऱ्या देशांना पाठवणे हे हत्याकांडच. यासाठी मोदींनी माफी मागावी,’ असे वक्तव्य नाना पाटोले यांनी केले आहे. त्यावर बोलताना दरेकर म्हणाले की, जन आशीर्वाद यात्रेतील कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केले जात आहेत. आमची यात्रा अयशस्वी करण्यासाठीच गुन्हे दाखल केले जात आहेत. मोदींना आशीर्वाद देण्यासाठी लोक यात्रेत येत आहेत. त्यांना कोणीही बोलवत नाही. शासकीय कार्यक्रम सध्या होत आहेत, त्याला गर्दी होते, ती चालते. फक्त आमच्या कार्यक्रमांकडे बोट दाखवले जात आहे. ‘स्वत:चे ठेवायचे झाकून आणि दुसऱ्याचे बघायचे वाकून’ अशी या सरकारची रित आहे, अशी टीका त्यांनी केली.
पटोले यांनी आधी वैचारिक उंची वाढवावी प्रविण दरेकर यांचे नाना पटोले यांना प्रत्युत्तर
Date:

