भाजपकडून पियुष गोयल आणि अनिल बोंडे यांना राज्यसभेची उमेदवारी

Date:

मुंबई- पियुष गोयल आणि अनिल बोंडे यांना भाजपकडून राज्यसभेची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. पियुष गोयल यांना राज्यसभेवर पुन्हा संधी देण्यात आली आहे. तिसऱ्या जागेसाठी भाजप कोणाची निवड करतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.राज्यसभेच्या उमेदवारीबाबत राज्यात वातावरण तापलं आहे​​​​​​​. राज्यसभेच्या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची शेवटची तारीख 31 मे आहे. आता फक्त दोन दिवसांचा अवधी शिल्लक आहे.

राज्यसभेवर उमेदवारी दिल्यानंतर भाजप नेते अनिल बोंडे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, देवेंद्र फडणवीस आणि जे. पी. नड्डा यांच्यासह चंद्रकांत पाटील यांनी माझ्यावर विश्वास टाकला. त्यांचे मनापासून आभार मी मानतो. ओबीसी समाजातील माझ्यासारख्या व्यक्तीवर विश्वास टाकला. सामान्य जनता, शेतकरी, मजूरांसाठी काम करणार आहे.

यावेळी त्यांनी महाविकास आघाडीवर टीका केली. ते म्हणाले की, महाविकास आघाडीची कानउघडणी करणार आहे, मी बहुजन समाज आणि ओबीसी वर्गाची बाजू राज्यसभेत मांडणार आहे. अमरावती जिल्ह्याला कैक वर्षांनी उमेदवारी मिळाली हे संतूलन आमचे नेते देवेंद्र फडणवीसांनी साधल्याचेही ते म्हणाले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

झोपडीपट्टीचा विकास हाच खरा आमचा संकल्प — आमदार सुनील कांबळे

— लोहियानगर झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पाचे आमदार सुनील कांबळे व...

मिर्चीच्या ‘वेस्ट-हर्ता’ उपक्रमाची आशिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद,पुण्यात भव्य गौरव सोहळा संपन्न

पुणे —सामाजिक स्वच्छतेच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलणाऱ्या रेडिओ मिर्चीच्या...