नागपूर – भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२६ व्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी नागपुरात दाखल झाले आहेत. यावेळी त्यांनी दीक्षाभूमी येथे भेट देऊन महामानवाला अभिवादन केले. येथील गौतम बुद्ध यांच्या मूर्तीलाही पंतप्रधानांनी अभिवादन केले. यावेळी मोदींसोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हेदेखील उपस्थित होते.
सकाळी डॉ.बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर पंतप्रधान यांचे आगमन झाले. पंतप्रधानांच्या स्वागताच्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राज्यपाल व्ही. विद्यासागर राव हे उपस्थित होते. दीक्षाभूमी हे देशातील नव्हे तर जगातील बौद्ध धर्मीयांचे एक प्रमुख केंद्र आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी येथे १४ ऑक्टोबर १९५६ रोजी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली होती.
कोराडी येथील प्रकल्प आणि माणकापूरमध्ये क्रीडा संकुलाचे लोकार्पण केले. तसेच ऊर्जा प्रत्येक नागरिकाचा अधिकार असून 2022 प्रत्येक प्रत्येकाला स्वत:चे घर मिळेल असे मोदींनी पुन्हा आश्वासन दिले .कोरडी येथे मोदींच्या हस्ते देशातील पहिल्याच सुपर क्रिटिकल तंत्रावर आधारित 660 मेगावॅट संचाचे लोकार्पण करण्यात आले. मोदींची प्रकल्पाची पाहाणी केली. त्यानंतर नरेंद्र मोदी कोराडीहून मानकापूर येथे पोहोचले आहे. मानकापूर येथील विभागीय क्रीडा संकुल येथे आयोजित शासनाच्या विविध प्रकल्पाचा शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आला. यात ‘भीम आधार अॅप’चे अनावरण, आयआयटी आयआयएम आणि एम्स भूमिपूजन करण्यात आले. तसेच डॉ. आंबेडकरांची दीक्षाभूमी’ हे विशेष टपाल तिकीट पंतप्रधानांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आले.