पुणे, दि.17- कोरोनाच्या बाबतीत पुणे शहराची स्थिती अत्यंत चिंताजनक असून केंद्र सरकारने पुण्यात लसीकरणाची केंद्रे उघडावीत. अशी मागणी खा. गिरीश बापट यांनी बुधवारी लोकसभेत केली.सभागृहाचे कामकाज सुरू होताच बापट यांनी शून्य प्रहरात पुण्यातील कोरोना विषयक प्रश्न उपस्थित केला.ते म्हणाले ” कोरोनाच्या बाबतीत पुण्याची स्थिती आज अत्यंत चिंताजनक आहे. पुण्यामध्ये दररोज दोन हजार लोक कोरोनाने बाधित होत आहेत. महाराष्ट्राच्या तुलनेत राज्यातील 20 टक्के रूग्ण पुण्यात बाधित होत आहेत. देशातील बाधितांच्या तुलनेतही पुण्यातील रुग्णांचे प्रमाण मोठे आहे. त्यामुळे पुण्यात चिंतेचे वातावरण पसरलेले आहे कोरोनाची लस टोचण्याचे काम केंद्र सरकारच्या मदतीने चालू आहे. त्याबद्दल मी केंद्र सरकारला धन्यवाद देतो. तथापि आजची गरज पाहता लसीकरणाची केंद्र पुण्यामध्ये मोठ्या संख्येने उघडावीत .अशी माझी मागणी आहे. पुण्यात लसीकरणाला नागरिकांचा प्रतिसादही चांगला आहे. त्या दृष्टिकोनातून विचार करता कोरोना नियंत्रणात येईल. असे मला वाटते. केंद्र सरकारने पुण्यात जास्तीत जास्त केंद्रे उघडावीत अशी माझी मागणी आहे.
पुण्यात लसीकरण केन्द्रे उघडा : खा.बापट यांची लोकसभेत मागणी
Date:

