पुणे : नदीपात्रामध्ये वाढणाऱ्या जलपर्णीचे समूळ निर्मूलन व्हावे याकरिता आयसर ( इंडियन इन्स्टी. ऑफ सायन्स, एज्युकेशन रिसर्च ) या संशोधन संस्थेशी संपर्क साधून त्यांची मदत घेतली जाईल, असे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी सांगितले.
नदीपात्रातील जलपर्णी निर्मूलनाचे काम खडकी, औंध, बोपोडी भागात चालू आहे. या कामाची पाहाणी अतिरि क्त आयुक्त सुरेश जगताप आणि भोंध क्षेत्रीय अधिकारी जयदीप पवार यांच्यासमवेत आमदार शिरोळे यांनी बुधवारी केली. येत्या पंधरा दिवसात जलपर्णी निर्मूलनाचे काम पूर्ण होईल, असे अधिकाऱ्यांनी आमदार शिरोळे यांना सांगितले.
या पहाणी दौऱ्यात आमदारांसमवेत नगरसेविका सुनिता वाडेकर, शिवाजीनगर मतदारसंघ भाजपचे सरचिटणीस आनंद छाजेड, सोनाली भोसले, सुप्रिया खैरनार, गणेश नाईकरे, उत्तम बहिरट, सचिन वाडेकर, अनिल भिसे, सौरभ कुंडलीक, सुप्रीम चौंडे, रोहित भिसे, जय जोशी आदी सहभागी झाले होते.
जलपर्णी निर्मूलनासाठी राज्य सरकारने यंत्रणा आणि तंत्रज्ञान पालिकांना द्यावे, अशी मागणी पालकमंत्री अजित पवार आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे केली आहे, असे आमदार शिरोळे यांनी सांगितले.

