पुणे-कष्टकरी घरगुती कामगार महिलांच्या थकलेल्या भत्त्याचे पैसे राज्य शासनाने त्वरीत वितरीत करावेत अशी मागणी भाजपा महिला मोर्चाच्या वतीने करण्यात आली आहे.
या संदर्भात मंजुश्री खर्डेकर आणि हर्षदा फरांदे म्हणाल्या कि,’ राज्य शासनाने कोरोना काळात घरगुती कामे करणाऱ्या महिलांना तातडीची मदत म्हणून १५०० रुपये देण्याची योजना जाहीर केली होती. या योजनेचा लाभ मिळू शकणाऱ्या लाभार्थ्यांनी सर्व अटी व निकषांची पुर्तता करुन विविध माध्यमांद्वारे आपले अर्ज दाखल केले आहेत. तरी देखील त्यांना शासनाकडून अद्यापही हा निधी मिळालेला नाही अथवा याबाबत कोणतीही माहिती प्राप्त झालेली नाही.याबाबत बऱ्याच घरगुती कामगार महिला भगिनींच्या आणी विशेषत: कोथरुड विधानसभा मतदारसंघातील रहिवासी असणाऱ्या महिला भगिनींकडून प्राप्त झालेल्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा कोथरुड मतदारसंघातर्फे या विषयासंदर्भात निवासी उपजिल्हाधिकारी डॅा. जयश्री कटारे व पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांना निवेदन दिले आहे.
हे निवेदन देण्यासामयी शिक्षण समिती अध्यक्षा नगरसेवक मंजुश्री खर्डेकर, पुणे शहर महिला मोर्चा सरचिटणीस कांचनताई कुंबरे, कोथरुड महिला मोर्चा सरचिटणीस गायत्रीताई काळभोर, उपाध्यक्षा पल्लवीताई गाडगीळ, जयश्रीताई तलेसरा, सुप्रियाताई माझीरे, चिटणीस रमाताई डांगे, सोशल मिडीया प्रमुख कल्याणीताई खर्डेकर आदी उपस्थित होते.

