पुण्यात इच्छुकांच्या क्रेनफुलमाळांंनी,ढोल ताशांनी ,फटाक्याच्या आतिशबाजीत महाजनादेश यात्रेचे जंगी स्वागत

Date:

पुणे :पुण्यात विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुकांच्या क्रेनफुलमाळांंनी,ढोल ताशांनी ,फटक्याच्या आतिशबाजीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजानादेश यात्रेचे जंगी  स्वागत करण्यात आले . राज्यभर भारतीय जनता पक्षाने काढलेली महाजनादेश यात्रा ही जनतेचे आशीर्वाद घेण्यासाठी काढली आहे आणि त्यासाठी मी पुण्यात आलो आहे असे वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात केले आहे. यावेळी त्यांच्यासोबत  पालकमंत्री चंद्रकांत पाटील,गिरीश महाजन ,खासदार संजय काकडे ,खासदार गिरीश बापट, आणि अन्य मान्यवर सहभागी झाले होते

उरली कांचन ,हडपसर पासून पुण्यातील भाजप नेत्यांनी या यात्रेचे जंगी स्वागत शेवटपर्यंत मोठ्या हिकमतीने आणि नानाविध युक्त्या प्रयुक्त्या वापरून करण्याचा प्रयत्न केला .

महाजनादेश यात्रेच्या  स्वागतासाठी स्वारगेट परिसर भाजपामय झाला होता. रस्त्यावर सर्वत्र कमळ, नेते, कार्यकर्ते स्वागतासाठी तयारीत दिसत होते. सेव्हन लव्ह चौकपासून ते सारसबाग पर्यंत सर्वत्र रस्त्यावर ढोल ताशांच्या गजरात महाजनादेश यात्रेच्या स्वागताची जोरदार तयारी झाली होती. ठिकठिकाणी स्थानिक नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्ते या यात्रेचे स्वागतासाठी उभे होते. पर्वती मतदारसंघातून सभागृहनेते श्रीनाथ भिमाले यांनी कुमार मॉल, सेव्हन लव्ह चौक, पौर्णिमा टॉवर परिसरात ठिकठिकाणी वाद्य पथक, हलगी पथक, ढोलताशा पथकं उभी केली होती. तसेच हजारो कार्यकर्ते, महिला फेटे घालून हातात स्वागताचे फलक घेऊन स्वागतासाठी उभे होते. दरम्यान, सारसबागेजवळ भाजपकडून स्वागताची जय्यत तयारी केली होती. छत्रपती शिवाजी महाराज, जिजाऊ, मावळे अशी वेशभुषा केलेले कलाकार मुख्यमंत्र्यांच्या स्वागताला उभे होते. या ठिकाणी शनिवारवाड्याची प्रतिकृती साकारण्यात आली होती. याच्या माध्यमातून फडणवीस सरकारने राज्यात आतापर्यंत राबविलेल्या योजना फ्लेक्स झळकवले जात होते.हीच परिस्थिती पुण्याच्या विविध परिसरात होती . नगरसेवक धीरज घाटे यांनी यात्रेच्या वाहनावर चढून जाण्याचा हिकमतीने केलेला यशस्वी प्रयत्न मोठ्या उत्सुकतेने पाहिला गेला .सुशील मेंगडे ,मुरलीधर मोहोळ महेश वाबळे ,योगेश टिळेकर आदींच्या क्रेनफुलमाळा या सर्वांचे लक्ष वेधून घेत होत्या . डाव्या बाजूला खासदार बापट यांनी मुख्यमंत्र्यांच्या शेजारी आपला ठिय्या कायम ठेवला .बापटांच्या मागे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील कायम राहिले तर मुख्यमंत्र्यांच्या मागे खासदार काकडे यांनी बापटांप्रमाणेच आपला ठिय्या कायम ठेवला  तर उजव्या बाजूला महापौर मुक्ता टिळक .आमदार माधुरी मिसाळ, नंतर आमदार विजय काळे असे चेहरे बदलत गेले .

विविध ठिकाणी फुले उधळणे, भेट वस्तू देणे ,बँँडबाजी ,ढोल बाजी ,एका ठिकाणी तर जिवंत देखावा तसेच फटाक्यांची आतिषबाजी करणे या सह विविध फलक ,भव्य दिव्य पोस्टर लक्ष वेधून घेत होते.

नगरसेविका मंजुश्री खर्डेकर व भाजप चे शहर उपाध्यक्ष संदीप खर्डेकर यांच्या पुढाकाराने दिव्यांग बंधु भगिनींनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आगळेवेगळे स्वागत केले दिव्यांग बांधवांनी आज रात्रौ ९ वाजता नळस्टॉप चौक येथे माननीय मुख्यमंत्र्यांचे अभिनव स्वागत केले – दिव्यांग व्यक्तींना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देवेंद्रजी फडणवीस यांनी जी सन्मानाची वागणूक दिली व त्यांच्यासाठी ज्या विविध योजना आणल्या त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी एनेब्लर चॅरिटेबल ट्रस्ट,चे आधारस्तंभ अमोल शिनगारे,अभिजीत शेडगे,मरियप्पा आचकेरी,संतोष भालेराव,राजू हिरवे,संतोष गायकवाड,रामा चलवादी,
त्यांच्या सहकाऱ्यांसह सर्व बांधवांनी त्यांनी बनविलेल्या वस्तू भेट देउन अभिवादन केले.

शुक्रवार (दि. १३ सप्टेंबर)पासून महाजानदेश यात्रेच्या तिसऱ्या टप्पाला सुरुवात झाली आहे. .तिसऱ्या टप्प्यात ही यात्रा १३ जिल्ह्यातील ६० विधानसभा मतदारसंघातून १,५२८ कि. मी. प्रवास करणार आहे.

मुख्यमंत्री म्हणाले कि, मागील पाच वर्षांत सरकारने केलेली कामे जनतेच्या दरबारी मांडून जनतेचा आशीर्वाद मिळवायचा आणि पुन्हा एकदा पाच वर्षांकरिता जनतेच्या सेवेत कार्यरत व्हायचं याकरिता ही यात्रा काढली आहे.मी केवळ तुमचा जनादेश घ्यायला आहे. तुमचा आशीर्वाद हाच जनादेश समजून आम्ही मुंबईला जातो आणि विधानसभेवर महायुतीचा झेंडा लावून परत येऊ असे सांगण्यासही ते विसरले नाहीत.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पुण्याचे वैभव वाघ शिंदेंच्या शिवसेनेचे प्रभारी राज्य निवडणूक समन्वयक पदी…

पुणे- शिवसेनेचे उप-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार,शिवसेनेच्या ...

अमोल बालवडकर मित्र परिवाराच्या वतीने आयोजित स्नेहमेळावा हजारो नागरीकांच्या उपस्थितीत उत्साहात संपन्न

पुणे-नूतन वर्षाच्या स्वागताच्या पार्श्वभूमीवर अमोल बालवडकर मित्र परिवाराच्या वतीने...

कोकाटेंसाठी 6 तास, 40 आमदारांवर अजून निर्णय नाही:संजय राऊतांची सुप्रीम कोर्टावर नाराजी

मुंबई- शिवसेना नाव आणि चिन्हाच्या प्रकरणावरून त्यांनी सर्वोच्च न्यायालयालाही...

रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीचा अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला पाठींबा.

पुणे : पुणे व पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी रिपब्लिकन...