वासुदेव नाना काळे यांच्या नेतृत्वाखाली पुण्यातील साखर संकुलाबाहेर असंख्य कार्यकर्त्यांसह धरणे आंदोलन..
पुणे, २९ सप्टेंबर-महाविकास आघाडी सरकारच्या एकरकमी एफआरपी न देण्याच्या शिफारशींच्या विरोधात भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाचा एल्गार आज पुण्यातील शिवाजीनगर येथील साखर संकु ल परिसरात पाहायला मिळाला. भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाचेप्रदेशाध्यक्ष मा. वासुदेव नाना काळे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्तेआणि शेतकऱ्यांनी राज्य सरकारच्या जुलमी धोरणाविरोधात धिक्कार करत आं दोलन केले.शेतकऱ्यांना एकरकमी एफआरपी मिळावा यासाठी भाजपा किसान मोर्चाआवाज उठवत आहेत. अतिवृष्टीमुळेराज्यभर शेतकऱ्यांची पिके पाण्याखाली गेलेआहे. मुसळधार कोसळणारा पाऊस, झालेले प्रचंड नुकसान त्यामुळेशेतकऱ्यांच्या अश्रूंचा बांध फु टला आहे. त्यातच महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांना टप्प्याटप्प्यानेएफआरपी देण्याची शिफारस के ली आहे. शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम हे निर्दयी महाविकास आघाडी सरकार करत आहे. त्याचाच निषेध करत आज हजारो कार्यकर्त्यांनी साखर संकु लावर धरणे आंदोलन केले. आयुक्तांची भेट घेऊन शेतकऱ्यांच्या रास्त मागण्यांचेनिवेदन देऊ के ले. शेतकऱ्याला एकरकमी एफआरपी मिळेणेहा त्यांचा अधिकार आहे, तो अधिकार त्यांना प्राप्त होईपर्यंत आम्ही थांबणार नाही असा इशारा किसान मोर्चाच्यावतीने देण्यात आला आहे.या धरणे आंदोलनात गणेशतात्या भेगडे, मकरंद कोर्डे, दिलीप राव देशमुख, रमेश पोकळे, माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे, माजी आमदार भगवानराव साळंुखे, संतोष दाभाडे, रंगनाथ सोळंके , धर्मेंद्र खांडरे, भारत जगताप, अनिल केंद्रे, रोहित चिवटे, रामकृष्ण वेताळ, दीपक वारे,संजयनाना थोरात, माऊली चवरे, प्रदीप मांडवकर, उत्तमराव माणे, संतोष जाधव, संजय पाटील, माऊली शेळके, गणेश आखाडे, काका निगडेवैभव आटोळे, भगवान काटे, सतीश कानवडे, संतोष तापकीर, रामदास शिंदे, प्रताप चींधे इत्यादी किसान मोर्चा पदाधिकारी उपस्थित होते.

