पुण्यात आठ ही जागांवर भाजपचा झेंडा

Date:

विजयी आमदार
* भाजप : गिरीश बापट (कसबा), माधुरी मिसाळ (पर्वती), प्रा. मेधा कुलकर्णी (कोथरूड), दिलीप कांबळे (कॅन्टोंमेंट), जगदीश मुळीक (वडगाव शेरी), विजय काळे (शिवाजीनगर), योगेश टिळेकर (हडपसर), भीमराव तापकीर (खडकवासला), लक्ष्मण जगताप (चिंचवड), बाबूराव पाचर्णे (शिरूर), राहुल कुल (दौंड), संजय भेगडे (मावळ)
* शिवसेना : गौतम चाबुकस्वार (पिंपरी), विजय शिवतारे (पुरंदर), सुरेश गोरे (खेड)
*राष्ट्रवादी : अजित पवार (बारामती), दिलीप वळसे-पाटील (आंबेगाव), दत्तात्रय भरणे (इंदापूर)
*काँग्रेस : संग्राम थोपटे (भोर)
*मनसे : शरद सोनावणे(जुन्नर)

पुणे – पुणे शहरातील आठपैकी ८ आणि जिल्ह्यातील ४ जागा जिंकून भारतीय जनता पक्षाने ‘राष्ट्रवादी’ आणि काँग्रेसला धुळीस मिळवले. राष्ट्रवादी काँग्रेसचे संख्याबळ कमी होऊन तीनवर आले, तर काँग्रेसचे अस्तित्व केवळ एका मतदारसंघापुरते उरले. शिवसेनेचा ‘धनुष्य-बाण’ गेल्यावेळेप्रमाणेच तीन ठिकाणी चालला. राज्यभर कपाळमोक्ष झालेल्या मनसेने पुणे जिल्ह्यातील जुन्नरची एकमेव जागा ‘राष्ट्रवादी’कडून खेचून घेत लाज राखली.
लोकसभा निवडणुकीतील ‘मोदी लाट’ विधानसभेच्या निकालातही काँग्रेस-राष्ट्रवादीला उद्ध्वस्त करून गेल्याचे चित्र पुण्यात दिसले. मोदींनी पिंपरी आणि बारामतीत सभा घेतली होती. शिवसेनेच्या गेल्यावेळच्या दोन जागा भाजपने खेचून घेतल्या; परंतु पुरंदरसह पिंपरी आणि खेड या दोन नव्या जागा जिंकत शिवसेनेने पुण्यातील संख्याबळ कायम राखले.
पुणे शहरातील आठही जागा जिंकण्याचा पराक्रम भारतीय जनता पक्षाने पहिल्यांदाच केला. भाजपच्या गिरीश बापट यांनी कसबा मतदारसंघातून सलग पाचव्यांदा विजय मिळवला. कोथरूडची जागा अपेक्षेप्रमाणे भाजपच्या प्रा. मेधा कुलकर्णी यांनी शिवसेनेकडून खेचून घेतली. शिवाजीनगरमध्ये विनायक निम्हण यांचा विजयाचा चौकार मारण्याचा प्रयत्न भाजपच्या विजय काळे यांनी हाणून पाडला.
बारामतीत अजित पवारांनी नेहमीच्या सहजतेने ८९ हजार ७९१ मतांनी प्रचंड विजय मिळवला. पवार दिलीप वळसे-पाटील यांनीही आंबेगाव सहज जिंकले. पवार आणि पाटील हे दोघेही सहाव्यांदा आमदार झाले. इंदापुरात दत्तात्रय भरणे यांनी पंधरा हजार मतांनी काँग्रेसच्या हर्षवर्धन पाटील यांना हरवत पहिल्यांदाच विधानसभेत प्रवेश केला. मात्र, हा आनंद राष्ट्रवादीला साजरा करता आला नाही. कारण, वडगावशेरी, जुन्नर, चिंचवड, पिंपरी, भोसरी, शिरूर, दौंड या गेल्या वेळच्या सात जागा राष्ट्रवादीला गमवाव्या लागल्या.
भाजपचे मित्र महादेव जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्षाने दौंड येथे राहुल सुभाष कुल यांच्या माध्यमातून राज्यातील एकमेव जागा जिंकली.
विजय काळे, जगदीश मुळीक, प्रा. मेधा कुलकर्णी, योगेश टिळेकर (भाजप), गौतम चाबुकस्वार (शिवसेना), महेश लांडगे (अपक्ष) पहिल्याच प्रयत्नात आमदार झाले, तर विनायक निम्हण, रमेश बागवे (काँग्रेस), दिलीप मोहिते, अशोक पवार, विलास लांडे, अण्णा बनसोडे, बापू पठारे, रमेश थोरात, (राष्ट्रवादी), चंद्रकांत मोकाटे, महादेव बाबर (शिवसेना) या १० विद्यमान आमदारांना प्रभाव पत्करावा लागला
गेल्या पाच महिन्यांत तिसरा पक्षप्रवेश करत ऐनवेळी भाजपत आलेल्या लक्ष्मण जगताप यांनी चिंचवडमध्ये विजय मिळवला.
माधुरी मिसाळांचे तब्बल ६९ हजार ७० हे मताधिक्य हा प. महाराष्ट्रातील भाजपचा सर्वात मोठा विजय ठरला. सलग पाचवा विजय मिळवणारे भाजपचे गिरीष बापट पश्चिम महाराष्ट्रातील भाजपचे सर्वात ‘सीनियर’ आमदार ठरले.
१९९५ पासून आमदार आणि मंत्री असलेले काँग्रेस नेते हर्षवर्धन पाटील पहिल्यांदाच पराभूत झाले

medha kulkarni

bhimrav tapkir

dilip kamble

jagdish mulik

jagdish muliik

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

Waqf Amendment Bill: वक्फ दुरूस्ती विधेयक मध्यरात्रीनंतर लोकसभेत मंजूर

नवी दिल्ली:केंद्रीय अल्पसंख्यांक मंत्री किरेन रिजिजू यांनी काल (बुधवारी)...

“हे तर मुस्लिमांना देशोधडीला लावण्याचं हत्यार”, वक्फवरील चर्चेदरम्यान राहुल गांधींचं ट्विट

नवी दिल्ली: व क्फ बोर्ड दुरुस्ती विधेयकावर बुधवारी दिवसभर...

राष्ट्रवादी पदाधिकाऱ्याकडून मुलीवर अत्याचार,बंगल्यात डान्सबार चालवल्याचाही आरोप- शिवसेना आक्रमक

पुणे- राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाच्या अल्पसंख्यांक विभागाचा राज्य...