पुणे-एकवीस वर्षीय मुस्लीम तरुणीचा खून केल्यानंतर तिच्या प्रेताची विल्हेवाट लावण्यासाठी पुण्यातील एका भाजप नगरसेवकाच्या मोटारीचा वापर करण्यात आल्याची धक्कादायी माहिती पोलिसांनी दिली आहे . दरम्यान ज्या दिवशी खून झाला त्याच दिवशी हि मोटार चोरीला गेल्याची नोंद आहे असाही खुलासा पोलिसांनी केला आहे .
दरम्यान या प्रकरणी स्वारगेट पोलीस ठाण्याचे निरीक्षक यांनी सांगितले कि , लग्नास नकार देणा-या प्रेयसीची ओढणीने गळा आवळून हत्या करणा-या सराईत गुन्हेगारासह दोघांना स्वारगेट पोलिसांनी अटक केली आहे . आरोपींनी तिचा मृतदेह इंदापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पळसदेव ते काळेवाडी या दरम्यान नेऊन टाकल्याची कबुली दिली आहे.
रझिया शेख, असे हत्या करण्यात आलेल्या तरुणीचे नाव आहे. सोहेल महेबूब शेख उर्फ बादशहा (वय 33, रा. औद्योगिक वसाहत, गुलटेकडी) आणि आरीफ उमर दरारशी शेख (वय 23), आणि जावेद शेख अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
वरिष्ठ निरीक्षक सर्जेराव बाबर यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोहेल हा सराईत गुन्हेगार असून, त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत. त्याला एकदा तडीपारही केलेले आहे. गेल्या काही काळापासून सोहेल आणि रझियाचे प्रेम संबंध होते. तो तिला लग्न कर म्हणून मागे लागला होता. परंतू, सोहेलचे यापूर्वी एक लग्न झालेले असून, त्याला तीन मुले आहेत. त्यामुळे रझिया त्याच्याशी लग्न करण्यास नकार देत असल्याने त्या दोघांमध्ये वाद होत होते. काही दिवसांपूर्वी त्याने रझियाला दुस-या एका तरुणासोबत फिरताना पाहिले होते. त्यामुळे तो आणखीन चिडला.
ही तरुणी मंगळवारी (दि.29) मध्यरात्रीपासून गुलटेकडी येथून गायब असल्याची माहिती स्वारगेट पोलिसांना मिळाली. त्यांनी त्वरीत शोध सुरू केला. आरोपी सोहेल याने या तरुणीचा खून केल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार त्याला आज दुपारी अटक करण्यात आली. त्याच्याकडे चौकशी केली असता लग्नास नकार दिल्याने व दुस-या मुलासोबत फिरताना दिसल्याने त्याने आरीफच्या मदतीने मंगळवारी मध्यरात्री रझियाचा ओढणीने गळा दाबून खून केला, अशी कबुली दिली. रझियाचा मृतदेह पळसदेव ते काळेवाडी या दरम्यान फेकून दिला सहाय्यक निरीक्षक मोरे, हवालदार कुलकर्णी, शेख यांच्या पथकाने येथे जावून मृतदेह पुण्यात आणला .
दरम्यान याप्रकरणी सहायक पोलीस आयुक्त डॉ. शिवाजीराव पवार यांनी पहा आणि ऐका नेमके काय सांगितले आहे ……..