पुणे- भाजपच्या नगरसेविका मंजुषा नागपुरे शहरात होणाऱ्या लसीकरण कारभाराबाबत अत्यंत संतापल्या आहेत , त्या म्हणाल्या , लसीकरणाचे नियोजन जे महापालिकेने केले आहे ते गल्ठांच आहे वास्तविक पाहता पुणे शहरातील कोव्हीड १९ चा प्रसार रोखण्यासाठी लसीकरण अत्यंत यशस्वी ठरत आहे. नागरिक देखील लसीकरण करून घेण्यासाठी पुढाकार घेत आहेत. अश्यातच प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे नागरिकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. एकूणच लसीकरण प्रक्रीयेबद्दल माझा आक्षेप नोंदवून घ्यावा.असे त्यांनी आयुक्तांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.
या पत्रात असेही म्हटले आहे कि,’सर्वप्रथम लसीकरणाच्या एकूणच नियोजनामध्ये ढिसाळपणा असून तो प्रशासनाने त्वरित दूर केलापाहिजे. लस उपलब्ध होणार आहे की नाही याची माहिती आदल्या दिवशीच न्यूज पोर्टल ,सोशल आणि इलेक्ट्रोनिक ,डिजिटल मिडीया ,वृत्तपत्रे इत्यादींचा वापर करून नागरिकांना दिली पाहिजे. जेणेकरून नागरिक लसीकरण केंद्रावर गर्दी
करणार नाहीत व त्यांना नाहक मनस्ताप सहन करावा लागणार नाही.
तसेच, १ मे पासून १८ वर्षांवरील नागरिकांसाठी लसीकरण सुरू केल्यामुळे होणारी गडबड
टाळण्यासाठी आता उरलेल्या दिवसात प्राधान्याने ४५ वरील व्यक्तींना दुसरा डोस देण्यात यावा. लसीकरणकेंद्रांवर नागरिक गर्दी करत आहेत, यात बहुतांश ज्येष्ठ नागरिकांचा समावेश आहे, यातून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला तर याची सर्वस्व जबाबदारी प्रशासनाची राहील
आणखीन एक विषय आपल्या निदर्शनास आणून देऊ इच्छिते कि, सर्व केंद्रांवर लसींचा पुरवठा
एक समान केला जात नाही. काही केंद्रांवर १०० ते २०० नागरिकांना लस मिळते. तर काही केंद्रांवर एकही लस उपलब्ध होत नाही, असे का ? आम्ही नागरिकांना काय उत्तर द्यायचे ? नागरिक सकाळी लवकर येऊन रांगेत थांबतात. आयत्या वेळेला लस येणार नाही असे समजल्यावर नागरिक मनस्ताप व्यक्त करतात.
तरी आपण सदरील विषयात लक्ष घालावे व लसीकरण मोहीम सुरळीत करून द्यावी असे नागपुरे यांनी म्हटले आहे .
भाजपच्या नगरसेविका नागपुरेही संतापल्या ..म्हणाल्या.. लसीकरणाचे महापालिकेचे नियोजन गलथानच ..
Date:

