पुणे – …..पुणे महापालिका निवडणुका जवळ आल्या आहेत .पुण्यात रिपब्लिकन पक्षाच्या मदतीमुळे मागील वेळेस भाजपाची सत्ता आली होती. याही वेळी आमच्यामुळे भाजपा सत्तेत येऊ शकते परंतु यावेळी आम्हाला सत्तेत महत्त्वाचा वाटा मिळाला पाहिजे असे मत रिपब्लिकन पक्षाचे नेते ,केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी पुण्यातील जाहीर सभेत व्यक्त केले.महापालिका निवडनूकीच्या निमित्ताने पुण्यात आज भीम छावा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्याम गायकवाड व नीलम गायकवाड यांचा रिपब्लिकन पक्षामध्ये प्रवेश झाला त्यानिमित्ताने ताडीवाला रोड येथे भव्य जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी ते बोलत होते.

पुढे ते म्हणाले की पुण्यात आमच्या पक्षाची खूप मोठी ताकत आहे .या शहरात झोपडपट्टी ची संख्या मोठ्या प्रमाणात आहे .त्यामुळे यावेळी पक्षाच्या कार्यकर्त्यांना महापालिका निवडणुकीत संधी दिली जाणार आहे.आता सर्व कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन निवडणुकीला सामोरे जाण्यास सज्ज राहण्याचे आदेश दिले .येथील रहिवाश्यांना रेल्वेकडून सातत्याने त्रास दिल्याच्या तक्रारी कार्यकर्त्यांनी सांगितल्या .त्यावेळी आठवले यांनी रेल्वेकडून होणारा त्रास तत्काळ थांबिवला जाईल असे आश्वासन दिले .येथील रहिवाशी कित्येक वर्षापासून येथे राहत आहेत .त्यांच्या पाठीशी मी ठामपणे उभा राहणार असल्याचं त्यांनी जाहीर सांगितले.
जगाला आज बॏध्द विचाराची गरज
पुढे ते म्हणाले की आज रशिया आणि युक्रेन उद्धामुळे सारे जग संकटात आहे . उद्ध नको , बुद्ध हवा म्हणजेच भगवान गौतम बुद्धाच्या विचाराची गरज आज साऱ्या जगाला असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. श्याम गायकवाड यांनी संपूर्ण देशभर आज नेते रामदास आठवले उपेक्षित ,वंचित लोकांसाठी काम करीत आहेत .त्यांच्या कार्यामुळे आपण आज रिपबलिकन पक्ष्यात प्रवेश करीत असल्याचे सांगितले . कार्यक्रमाचे अध्यक्ष व पुणे शहराध्यक्ष शैलेंद्र चव्हाण यांनी पुण्यातील गरीब ,दलीत ,उपेक्षित समाजाच्या हितासाठी पक्ष्याचे कार्यकर्ते महापालिका मध्ये जाणे गरजेचे असल्याचे सांगितले .तसेच यावेळी किमान 20 नगरसेवक निवडून पक्षाची ताकद वाढवणार असल्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला. या कार्यक्रमास उपमहापौर सुनीता ताई वाडेकर ,माजी उपमहापौर डॉ. सिद्धlर्थ धेंडे ,कार्यक्रमाचे संयोजक श्याम गायकवाड ,नीलिमा गायकवाड , रिपब्लिकन पक्षाचे शहराध्यक्ष शैलेंद्र चव्हाण,प्रदेश सचिव बाळासाहेब जानराव ,परशुराम वाडेकर ,मुस्लिम आघाडीचे प्रदेशाध्यक्ष अयुब शेख ,मातंग आघाडीचे प्रदेशाध्यक्ष हनुमंत साठे ,नगरसेविका हिमाली कांबळे ,महिपाल वाघमारे ,बसवराज गायकवाड ,असित गांगुर्डे ,अशोक कांबळे ,निलेश गायकवाड ,यशवंत नडगम ,संगीताताई आठवले यासह पुणे शहरातील कार्यकर्ते ,महिला व युवक मोठ्या संख्येने या जाहीर सभेस उपस्थित होते .

