उदयनराजे भाजप मार्गे संसदेत ..महाराष्ट्रातून भाजपकडून राज्यसभेचे उमेदवार महाराज भोसले आणि आठवले

Date:

मुंबई- भाजपकडून अखेर राज्यसभेचे उमेदवार घोषित करण्यात आले आहेत. विधानसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादीमधून भाजपमध्ये आलेले छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज उदयनराजे आणि रिपाइंचे अध्यक्ष रामदास आठवले यांना उमेदवारी देण्यात आली आहे. यावेळीही भाजप नेते एकनाथ खडसे यांना डावलण्यात आले आहे. महाराष्ट्रासोबतच मध्य प्रदेशच्या कोट्यातून नुकतेच काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेल्या ज्योतिरादित्य सिंधिया यांना राज्यसभेची उमेदवारी घोषित करण्यात आली.

अशी आहे यादी
भाजपाने बुधवारी नऊ राज्यांमधील राज्यसभा उमेदवारांची नावं जाहीर केली. यामध्ये असाम (भुवनेश्वर कालीता), बिहार (विवेक ठाकूर), गुजरात (अभय भारद्वाज, रमीलाबेन बारा), झारखंड (दीपक प्रकाश), मणिपूर (लिएसेंबा महाराजा), मध्य प्रदेश (ज्योतिरादित्य शिंदे, हर्ष सिंह चौहान), महाराष्ट्रातून (उदयनराजे भोसले, रामदास आठवले), राजस्थान (राजेंद्र गहलोत) यांचा समावेश आहे.

उदयनराजे भोसले उद्या आपला राज्यसभेसाठीचा उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. महाराष्ट्राच्या कोट्यातून राज्यसभेवर निवडून गेलेल्या 7 खासदारांचा कार्यकाळ एप्रिल महिन्यात संपणा आहे. एप्रिल महिन्यातच राज्यसभेच्या या 7 जागांसाठी निवडणूक होणार आहे. त्यामुळे भाजपकडून कुणाला उमेदवारी मिळणार याविषयी अनेक नावांची चर्चा होती. भाजपच्या दोन उमेदवारांचा विजय निश्चित आहे. त्यासोबतच रिपाइंचे अध्यक्ष रामदास आठवले यांचीही उमेदवारी निश्चित झाली. भाजप आता तिसऱ्या जागेवरही आपला उमेदवार उतरवणार आहे, पण, तिसऱ्या जागेवरच्या उमेदवाराचा विजय अवघड मानला जातो आहे.

दुसरीककडे, राष्ट्रवादीकडून दोन उमेदवार असणार आहेत. यात पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी बुधवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. तर दुसऱ्या उमेदवारासाठी माजी मंत्री फौजिया खान यांच्या नावाची चर्चा आहे. दरम्यान, फौजिया खान यांना शिवसेनेचे समर्थन असल्याचे सूत्रांकडून समजते. तर, काँग्रेसकडून अद्याप राज्यसभेसाठी उमेदवार घोषणा झालेली नाही. शिवसेनेकडे राज्यसभेसाठी एक जागा आहे, यात चंद्रकांत खरै, शिवाजीराव अढळराव यांच्या नावाची चर्चा सुरू आहे.

राज्यसभेसाठी उमेदवाराला पहिल्या पसंतीची 37 मते मिळणे आवश्यक आहे. राज्यातील सत्तेचे गणित बदल्यामुळे आघाडीचे चार तर भाजपचे दोन उमेदवार सहज निवडून येतील. शिल्लक राहिलेल्या मतांमधून आणखी एक उमेदवार निवडून आणण्याचा आघाडीचा आणि भाजपचा प्रयत्न असेल.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

सर्व धर्मीय ख्रिसमस स्नेह मेळावा संपन्न

पुणे; पुण्यातील येरवडा – शास्त्रीनगर भागातील सेक्रेड हार्ट चर्च येथे...

पुरंदर विमानतळामुळे पुणे परिसरातील औद्योगिक विकासाला प्रोत्साहन-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

• पुरंदर विमानतळाच्या भूसंपादनासाठी जास्तीत जास्त दर देण्याचा विचार•...

राज बब्बर,रमेश बागवे, मोहन जोशी,वसंत पुरकेंसह काँग्रेसच्या ४० स्टार प्रचारकांची यादी जाहीर.

मुंबई, दि. २३ डिसेंबर २०२५ राज्यातील २९ महानगरापालिकांच्या निवडणुकीसाठी काँग्रेस...

सत्तेच्या लोभी राजकारणाला आम आदमी पार्टी शह देईल..अरविंद केजरीवाल,भगवंत मान पुण्यात प्रचाराला येणार

पुणे- ' महाराष्ट्रात प्रस्थापित राजकीय पक्षांनी विचारधारा सोडून सामान्य...