Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

महापालिकेतील भाजपा आणि राष्ट्रवादीचा पुन्हा एकदा हातात हात : कॉंग्रेस एकाकी -हतबल सेना तटस्थ.

Date:

पुणे- अनेकदा दिसते तसे नसते हे पुणे महापालिकेच्या राजकारणात दिसून आले आहे. राष्ट्रवादीचे शहर अध्यक्षपदावर प्रशांत जगताप विराजमान झाल्यानंतर, निवडणूक तोंडावर असतानाही विशेषतः हे जास्त जाणवू लागले आहे . एकीकडे एकमेकांवर तुटून पडणारे हे विरोधक मैत्रीपूर्ण लढती देताना अनेकदा जाणवले आहे . कुठल्या कट्ट्यावर जाणे , किंवा कुठल्या समारंभात जाणे सोडा महापालिकेचे सभागृह अशा बाबींनी रंगमंच बनू पाहते कि काय ? असे वाटावे अशी स्थिती आहे. वास्तविक पाहता महापालिकेचे सभागृह हे जनहितासाठी सत्ताधारी आणि विरोधक यांच्यातील रणधुमाळी माजविणारे सभागृह जनहितासाठी कोण पुढे . याचे वास्तव इथे दिसले पाहिजे असा आजवरचा व्होरा या सर्व पार्श्वभूमीवर आता कुचकामी ठरू पाहत आहे . राष्ट्रवादीने एच सी एम टी आर च्या आरक्षण रचनेत बदल करणारे प्रस्ताव भाजपाला बरोबर घेऊन, कॉंग्रसच्या उघड विरोधात जाऊन मंजूर करवून घेतल्याची घटना १२ ऑक्टोबरच्या मुख्य सभेत दिसून आल्यावर आज चक्क अॅॅडपटीव्ह ट्रॅफिक मॅनेज मेंट सिस्टीम च्या स्मार्ट सिटी च्या 58 कोटीच्या खर्चाला मान्यता देताना भाजपा ला राष्ट्रवादीने उघड पणे मतदान करतच बिनदिक्कत पणे साथ दिली , यावेळी बुचकळ्यात पडलेली सेना तटस्थ राहिली आणि एकाकी पडलेल्या काँग्रेसने अवघ्या ३ मतांनी या प्रस्तावाला विरोध करत अवघ्या ३ विरुद्ध ४५ मतांनी हार मानली आणि हा विषय ४२ मताधिक्याने आजच्या मुख्य सभेत संमत झाला . राष्ट्रवादीच्या आणि कॉंग्रेसच्या ज्या ज्या नेते असलेल्या नगरसेवकांनी या प्रस्तावास जाहीरपणे माध्यमांपुढे येऊन विरोध केला होता ते सर्व या प्रस्तावाच्या वेळी गैरहजर राहिले . राष्ट्रवादीच्या अध्यक्षांनी तर या विषयावरून भाजपवर प्रचंड टीका केली असताना ऐन वेळी ते हा विषय मतदानाला आला तर भाजप बरोबर राहा असे आपल्या पक्षाच्या नगरसेवकांना सांगून सभा अर्ध्यावर सोडून गेले. 

गेल्या महिन्यात स्थायी समितीच्या बैठकीत स्मार्ट सिटीच्या १६० कोटी रुपयांच्या ‘एटीएमए’स प्रकल्पामध्ये महापालिकेने देखभाल दुरुस्तीचा खर्च उचलावा यासाठी पुढील पाच वर्षात ५८ कोटी रुपये देण्याचा प्रस्ताव आयत्यावेळी मंजूर करण्यात आला. यामुळे शहरातील सिग्नल व्यवस्था सुधारणार असल्याचा दावा भाजपने केला. दरम्यान, हे ५८ कोटी रुपयांचे काम भाजपच्या एका माजी पदाधिकाऱ्याच्या संबंधित ठेकेदाराला मिळाले असल्याचा आरोप काँग्रेसचे नगरसेवक अरविंद शिंदे यांनी केला होता . तर राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी याविरोधात पत्रकार परिषद घेतली होती. तसेच काँग्रेसच्या दोन गटांनी याचा स्थायी समितीमध्ये फेरविचार प्रस्ताव हि दिला होता.हा विषय आज मुख्यसभेत मंजुरीसाठी आल्यानंतरफेरविचारासोबत आंदोलन करणार्‍या राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीने आज पुन्हा एकदा ‘युटर्न’ घेतला तर फेरप्रस्ताव देणारे कॉंग्रेसचे नगरसेवक सभागृहातून गायब झाले होते. 

काँग्रेसचे अविनाश बागवे व शिवसेनेचे पृथ्वीराज सुतार यांनी विरोध करत स्मार्ट सिटीच्या अधिकाऱ्यांनी याची माहिती द्यावी अशी मागणी केली. या प्रस्तावास विरोध झाल्याने मतदान घेण्यात आले. त्यावेळी राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी अचानक भाजपसोबत हात वर करत या प्रस्तावाला मान्यता दिली. तर विरोधात काँग्रेसच्या केवळ तीन जणांनी मतदान केले.पृथ्वीराज सुतारांचा हि विरोध गलितगात्र झाल्याने शिवसेनेने तटस्थ भूमिका घेत भाजपला अप्रत्यक्ष फायदा करून दिला.

त्यांना ‘ उघडे पाडण्यात भाजपाला यश ?

एकीकडे कॉंग्रेसच्या अवघ्या ३ मतांचा विरोध पत्करत भाजपाने हा विषय राष्ट्रवादी ची मते मिळवीत शिवसेनेला तटस्थ ठेऊन मंजूर करवून घेतल्याने भाजपने देखील राष्ट्रवादी ला उघडे पाडल्याचे बोलले जाते आहे. सभागृह नेते बिडकर यांनी काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादीच्या अध्यक्षांच्या टीकेला उत्तरे देताना ‘यांना फक्त टेंडर्स मध्येच रस असल्याचे वक्तव्य केले होते .एवढेच नव्हे तर त्यांचा ‘टेंडर जगताप’ असाही उल्लेख करत टीका केली होती . आजच्या या सभागृहातील राष्ट्रवादीच्या घुमजाव ने आणि शहर अध्यक्ष व माजी महापौर असलेल्या जगताप यांच्या आयत्या वेळी कलटी मारण्याच्या घटनेने आता बिडकर यांनी आपल्या वक्तव्याची प्रचीती आणून दिली आहे असा दावाही केला जाऊ शकणार आहे .

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

काँग्रेसने वंदे मातरम् चे तुकडे केले:जिन्नासमोर नेहरू झुकले..मोदींचा पुनरघोष

नवी दिल्ली- पंतप्रधान मोदींनी सोमवारी लोकसभेत वंदे मातरम्‌ला १५०...

अखेर 21 डिसेंबरची MPSC परीक्षा लांबणीवर:आता 4 जानेवारीला होणार पेपर

मुंबई-महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या मतमोजणीमुळे 21...

मुंढवा प्रकरणातील आरोपी तहसीलदाराने 85.50 लाखांची थकबाकी भरली रोख…

पुणे -मुंढवा भूखंड घोटाळ्यातील आरोपी असलेल्या निलंबित...