आर्थिकदुरावस्था ओढावल्यांसाठी रोजगाराद्वारे हातभार लावण्याचा प्रयत्न-आ. चंद्रकांतदादा पाटील

Date:

पुणे- गेल्या दोन वर्षात करोनामुळे समाजातील सर्वच वर्गाचे प्रचंड नुकसान झाले. अनेकांच्या हातचे रोजगार गेले. अजूनही आपला आर्थिक गाडा म्हणावा तसा रुळावर आलेला नाही. त्यामुळे आर्थिकदुरावस्था ओढावलेल्यांना रोजगाराच्या माध्यमातून हातभार लावण्याचा प्रयत्न केल्याचे प्रतिपादन भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मा. आ. चंद्रकांतदादा पाटील यांनी केले. आ. चंद्रकांतदादा पाटील यांच्या जनसंपर्क कार्यलायात ‘एक हात मदतीचा’ उपक्रमाच्या द्वितीय कर्तव्यपूर्ती कार्यक्रमात ते बोलत होते.

या कार्यक्रमाला नगरसेवक जयंत भावे, कोथरुड मंडल अध्यक्ष पुनित जोशी, पुणे शहर उद्योग आघाडीच्या प्रमुख अमृता देवगांवकर यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

श्री. पाटील म्हणाले, कोरोनामुळे समाजातील सर्वच घटकांचे मोठे नुकसान झाले. अनेकांना आपला हातचा रोजगार गेला. अजूनही यातील काही घटक आर्थिक संकटांचा सामना करत आहेत. त्यामुळे आर्थिक दुरावस्था ओढवलेल्यांना आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी पुणे शहर उद्योग आघाडीच्या माध्यमातून रोजगाराची संधी उपलब्ध करुन देण्यात आली, असून याचा अनेकांना लाभ झाला. अजूनही आपला समाजाचा गाडा रुळावर आलेला नाही. त्यामुळे आर्थिक दुरावस्था ओढावलेल्यांना मदत करण्याची गरज असल्याचेही ते यावेळी म्हणाले.

ते पुढे म्हणाले की, कोरोनामुळे अनेक कुटुंबावर मोठा दु:खाचा डोंगर कोसळला. पालघर जिल्ह्यातील भाजपाचे 37 कार्यकर्ते कोरोनामुळे गेले. राज्याचा प्रदेशाध्यक्ष म्हणून मी त्या कुटुंबियांचे सांत्वन करण्यासाठी त्या कार्यकर्त्यांच्या घरी गेलो, त्यावेळी अतिशय वेदनीदायी दृश्ये पाहायला मिळाली. कारण, अनेक कार्यकर्त्यांसह त्यांच्या पत्नींचे देखील कोरोनामुळे निधन झाले होते. त्यामुळे आपण या संकटातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत आहोत. भारतीय जनता पक्ष आपल्या सर्वांच्या पाठिशी खंबीरपणे उभी आहे, असे यावेळी त्यांनी सर्वांना आश्वस्त केले.

आ. चंद्रकांतदादा पाटील यांच्या संकल्पनेतून आणि पुणे शहर उद्योग आघाडीच्या माध्यमातून कोथरुडमध्ये एक हात मदतीचा हा रोजगाराभिमुख उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमाअंतर्गत आर्थिकदुरावस्था ओढावलेल्यांना किमान दोन महिन्यांची रोजगाराची संधी मिळवून देण्यात आली. या सर्वांना त्यांच्या श्रमाचे मानधन आ. चंद्रकांतदादा पाटील यांच्या माध्यमातून लोकसहभागातून देण्यात आले. तसेच, या सर्वांना दोन महिन्याचा शिधावाटप ही करण्यात आले. या उपक्रमाचा अनेकांना लाभ झाला असून, यापैकी काहीजणांना कायमस्वरुपी रोजगार मिळाला आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

किडनी विक्री प्रकरणातील सावकरांवर कधी कारवाई करणार? – वडेट्टीवार

मुंबई- विदर्भातील शेतकऱ्यांना कर्ज फेडण्यासाठी किडनी विकवी लागल्याचा प्रकार...

DGCA कडून विमान कंपनीला वाचवण्याचा प्रयत्न:अजित पवार अपघात प्रकरणी रोहित पवारांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल

मुंबई-राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाचे आमदार रोहित पवार...

घरकुल लाभार्थ्यांना तीन पावसाळे उलटले तरी घर मिळाली नाही,जनाची नाही तर मनाची ठेवा – वडेट्टीवार

मुंबई- राज्यातील घरकुल योजनेतील घरं मंजूर होऊनही गेल्या तीन...

अमेरिकेत हिमवादळामुळे 11 हजार विमानांची उड्डाणे रद्द:5 लाख घरांची वीज गेली, 153 वर्षांत पहिल्यांदाच वर्तमानपत्र छापले जाऊ शकले नाही

वॉशिंग्टन डीसी-अमेरिकेत जोरदार वाऱ्यांमुळे आणि प्रचंड बर्फवृष्टीमुळे विमानतळावरील धावपट्ट्या...