चंद्रकांतदादांना न्यायालयाची क्लीन चिट – खोटे शपथपत्र दाखल केले नसल्याचा न्यायालयाचा निकाल

Date:

भाजप प्रदेशाध्यक्ष आ.चंद्रकांतदादा पाटील यांच्या विरोधातील निवडणूक शपथपत्रा बाबतची याचिका निकाली

भारतीय लोकप्रतिनिधी कायदा १९५१ च्या कलम १२५ (अ) अंतर्गत दाखल खटला रद्दबातल

हा सत्याचा विजय – चंद्रकांतदादांची भावनिक प्रतिक्रिया

एका सामान्य गिरणी कामगाराचा मुलगा राज्यातील महत्त्वाच्या खात्यांचा मंत्री होतो,भाजपचा प्रदेशाध्यक्ष पदापर्यंत वाटचाल करतो हे काही हितशत्रूंना मानवत नाही आणि त्यातून माझ्याविरुद्ध कुभांड रचले जाते व मला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला जातो मात्र अखेर सत्याचाच विजय होतो हे न्यायालयाच्या निकालाने दाखवून दिले असल्याचे मत आ.चंद्रकांतदादा पाटील यांनी व्यक्त केले.अश्या आरोपांची आता सवय झाली असून अश्या खोट्या आरोपां मुळे अनावश्यक मानसिक त्रास होतो मात्र अश्या कट कारस्थानातून मी अधिक तावून सुलाखून बाहेर पडतो व समाजसेवेचे जे व्रत स्वीकारले आहे ते पूर्ण करण्यासाठी पुन्हा सज्ज होतो असे भावनिक उदगार ही चंद्रकांतदादांनी काढले.
कोथरूड विधानसभा निवडणूक जिंकल्यावर चंद्रकांतदादा पाटील यांनी खोटे शपथपत्र दाखल केले असा आरोप करत श्री.अभिषेक हरिदास यांनी भारतीय लोकप्रतिनिधी कायदा १९५१ च्या कलम १२५ (अ) अन्वये दादांच्या निवडीविरुद्ध दाद मागितली होती.फौजदारी प्रक्रिया संहिता कलम २०२ अंतर्गत पुण्यातील फौजदारी न्यायालयात ( JMFC ) याबाबतचा खटला दाखल करण्यात आला होता.
न्यायाधीश जान्हवी केळकर यांनी विस्तृत निकालपत्रात आ.चंद्रकांतदादां विरुद्धचे सर्व आरोप फेटाळून लावले व सदर तक्रार काढून टाकली ( Complaint Dismissed ) व सदर खटला निकाली काढला ( Case is Disposed off ) .
तक्रारदाराच्या सर्व तक्रारींची व सोबतच्या साक्षी पुराव्यांची शहानिशा करुन मेहेरबान न्यायालयाने निरीक्षण नोंदविताना आ.चंद्रकांतदादां विरुद्ध चे सर्व आरोप चुकीचे असल्याचे म्हणट्ले आहे. यात प्रामुख्याने…
१) चंद्रकांतदादांनी शपथपत्रात जोडलेली आयकर विवरणपत्र योग्य असल्याचे निरीक्षण नोंदविले.
२) तसेच निवडणूक लढवत असताना चंद्रकांतदादा कोणत्याही लाभाच्या पदावर नसल्याने हा दावा ही फेटाळण्यात आला.
३) त्याचबरोबर चंद्रकांतदादा ज्या पदांवर पदसिद्ध होते त्या पदावरील व्यक्तीस मानधन मिळत नसल्याने शपथपत्रात उत्पन्न लपविले असे म्हणणे देखील अयोग्य असल्याचे ही निरीक्षण न्यायाधीशांनी नोंदवले.
४) तसेच चंद्रकांतदादा यांच्या विरुद्ध कोल्हापूर च्या न्यायालयात दाखल गुन्हा प्रकरणी देखील न्यायाधीशांनी तक्रारदाराचे म्हणणे फेटाळले आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पुन्हा एकदा पुण्यात भाजपाला क्रमांक एकचा पक्ष म्हणून स्थान मिळवून देऊ : मुरलीधर मोहोळ

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘कॅन्टोन्मेंट’मधील भाजपा पदाधिकारी-कार्यकर्त्यांचा मेळावा ! कोरेगाव...

खंडोबाच्या जेजुरीत घडलं अघटीत..

मिरवणुकीत आगीचा भडका– २ नगरसेविका गंभीर भाजल्या, १८ जण...

सरकारच्या एक वर्षाच्या कामगिरीवर राज्यातील जनता समाधानी असल्याचे या निकालांवरून स्पष्ट… अजितदादा

महायुतीमधील मित्रपक्षांनी एकमेकांच्या इच्छुक उमेदवारांना पक्षप्रवेश द्यायचे नाहीत, असे...

वसुंधरा संरक्षणासाठी हजारो नागरिकांनी घेतलेली शपथ गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये

पुणे पुस्तक महोत्सवाच्या समारोपाला विश्वविक्रम पुणे: पुणे पुस्तक महोत्सवाच्या...