मुंबई – ज्या भाजपच्या व्यासपीठावरून अनेक नेत्यांनी अनेकदा शरद पवारांचे कौतुक केले आज त्याच भाजपच्या व्यासपीठावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट शरद पवारांवर हल्ला केला .
भाजपाच्या 38व्या स्थापना दिनानिमित्त वांद्रे-कुर्ला संकुलातल्या महामेळाव्यात मुख्यमंत्र्यांनी जोरदार बॅटिंग केली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना लांडग्यांची उपमा देत हल्लाबोल केला आहे. सगळे लांडगे आता सत्तेच्या शिकारीसाठी एकत्र आले आहेत. पण हे लांडगेच उद्या दंगली घडवतील, असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी विरोधकांवर निशाणा साधला.
आमचा सिंहांचा पक्ष आहे, त्यामुळे हे लांडगे आमचं काहीही वाकडं करू शकणार नाहीत. विरोधकांनी हल्लाबोल यात्रा नव्हे, तर डल्ला मारो यात्रा काढली होती. भाजपाला नेहमीच भटा,ब्राम्हणांचा पक्ष म्हणून हिणवलं गेलं. देशाला पंतप्रधान नरेंद्र मोदींमुळेच भविष्य आहे. संविधानात दिलेलं आरक्षण कुणीही हिरावून घेऊ शकत नाही, असंही मुख्यमंत्री म्हणाले आहेत. मी भरलेल्या वर्गाचा मॉनिटर आहे, तुमच्यासारखा रिकाम्या वर्गाचा मॉनिटर नाही, मुख्यमंत्र्यांनी नाव न घेता राज ठाकरेंना लक्ष्य केलं. ‘आम्ही चहा पितो. त्यामुळे आमच्याकडे येणाऱ्या लोकांनाही आम्ही चहाच देतो,’ अशा शब्दांमध्ये फडणवीसांनी शरद पवारांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले. यापुढे जाऊन मुख्यमंत्र्यांनी पवारांना थेट इशाराही दिला. ‘पवारसाहेब, चहावाल्याच्या नादी लागू नका. 2014 मध्ये उडालेली धूळधाण लक्षात ठेवा,’ अशा शब्दांमध्ये मुख्यमंत्र्यांनी पवारांवर शरसंधान साधले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या हल्लाबोल यात्रेवरही त्यांनी टीका केली. आधी राज्याच्या तिजोरीवर डल्ला मारणारे आता हल्लाबोल करत आहेत, असे मुख्यमंत्री म्हणाले.भाजपमध्ये खरी लोकशाही येथे सामन्यांना पक्षाध्यक्ष होता येतं. त्याचमुळे मी अध्यक्ष बनू शकलो. भारतीय जनता पार्टी ही खरी जनतेची पार्टी असून, ही आई व मुलाची पार्टी नाही असे नितीन गडकरी म्हणाले.
या सभेत काय म्हणाले अमित शहा-
– राहुल गांधी सध्या शरद पवारांसोबत बसतात, त्यांनी इंजेक्शन दिल्याने ते मोदींना साडेचार वर्षात काय केले असे विचारतात, पण काँग्रेसने मागील 70 वर्षात काय केले त्याचे उत्तर द्यावे.
– मोदींचा सबका साथ, सबका विकास हे धोरण.
– मोदींच्या नेतृत्त्वात देशाच्या काना- कोप-यात कमळ पोहचले.
– 38 वर्षात अनेक मान्यवरांनी कठोर परिश्रम घेतल्याने भाजप पक्ष मोठा झाला.
– भाजप एससी, एसटी समाजाच्या पाठीशी, आरक्षण हटविणार नाही आणि इतरांना ते हटवूही देणार नाही.
– राजकारणात सत्तेत उपभोग घेण्यासाठी भाजपचा जन्म झाला नाही- अमित शहा- काँग्रेसच्या काळात शेतीमालाला भाव मागून शेतकरी थकले पण तो वाढवून दिला नाही.
– 2019 च्या निवडणुकीच्या बिगूल वाजला आहे. सर्व विरोधक एकत्र या एकत्र या म्हणत आहेत कारण तो मोदींना घाबरले आहेत- अमित शहा
– 2019 च्या निवडणुकीत मोदी सरकारच्या लेखा-जोखा घेऊन लढायचे आहे.
– राहुल गांधींवर हल्लाबोल करताना अमित शहा म्हणाले, आम्ही यूपीमध्ये पोटनिवडणुकीत केवळ दोन जागा हरलो आहे. तर काँग्रेस 11 राज्यांत पराभूत झाली आहे.
– मात्र, काँग्रेस उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली तरी ते दुस-यासाठी पेढे वाटत आहेत, असा नेता व पक्ष पहिल्यांदाच पाहिला जो अनामत रक्कम जप्त झाल्यानंतर पेढे वाटले. .
*काय म्हणाले चंद्रकांतदादा पाटील
– होय, भुजबळांच्या कोठडीशेजारी दोन जागा…
काय म्हणाले सुधीर मुनंगटीवार-
– उंदिर मंत्रालयात नाहीत तर यांच्या डोक्यात…