‘भ्रष्टाचारी राज्याची ओळख फडणवीस यांनी बदलली’-जे. पी. नड्डा

Date:

 
पुणे-पाच वर्षांपूर्वी राज्यातील सर्व पैसा उचलून स्वत:ची घरे भरणाऱ्या नेत्यांमुळे महाराष्ट्राची ओळख भ्रष्टाचारी राज्य म्हणून झाली होती. राज्यात भारतीय जनता पक्षाचे सरकार सत्तेत आल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे चित्र बदलले’, असे प्रशस्तिपत्र भाजपचे कार्याध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी सोमवारी दिले. राज्याला प्रगतिपथावर पुढे नेण्यासाठी येणाऱ्या निवडणुकीतही पुन्हा भाजपलाच विजयी करण्याची संधी दवडू नका,’ असा सल्ला त्यांनी कार्यकर्त्यांना दिला.
 
भाजपतर्फे पश्चिम महाराष्ट्रातील पदाधिकारी-कार्यकर्त्यांच्या विजय संकल्प मेळाव्यात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. आगामी निवडणुकीची रणनीती स्पष्ट करताना कलम ३७० सह केंद्र सरकारने घेतलेले निर्णय आणि राज्यातील फडणवीस सरकारच्या योजनांची माहिती प्रत्येक घराघरांत पोहोचवा, अशा सूचना त्यांनी कार्यकर्त्यांना केल्या. कार्यकर्त्यांच्या बळावर आगामी निवडणुकीत पक्षाला अधिक चांगले यश मिळेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. शिक्षण आणि आरोग्यातील पिछाडी राज्याने भरून काढली असून शेतकऱ्यांना कर्जमाफी, सिंचन प्रकल्प, रस्ते विकास, पायाभूत सुविधा, मेट्रो अशा अनेक विकास प्रकल्पांना राज्याचा चेहरामोहरा बदलण्याचे काम वेगाने सुरू आहे, असे निरीक्षण त्यांनी नोंदविले.
 
जम्मू-काश्मीरमधील कलम ३७०, तिहेरी तलाक, कॉर्पोरेट करातील सवलत यासारख्या अनेक निर्णयांमुळे नागरिकांना फायदा होत आहे. त्याची माहिती मतदारांपर्यंत पोहोचवा, असेही त्यांनी स्पष्ट केले. ‘देशातील बहुतांश राजकीय पक्ष हे एखाद्या कुटुंबाशी संबंधित आहेत. त्यांचे राजकारण कुटुंबातील ठरावीक व्यक्तींभोवतीच फिरते; पण भाजपमध्ये ही स्थिती नाही. त्यामुळे कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसतानाही मोदींसारखा सामान्य कार्यकर्ता पंतप्रधान होऊ शकतो’, असे नमूद करत कार्यकर्ता हीच भाजपची ताकद असल्याचे त्यांनी सांगितले.
 
या मेळाव्याला पक्षाचे सरचिटणीस आणि प्रदेश संघटनमंत्री व्ही. सतीश, पुण्याचे खासदार गिरीश बापट, महापौर मुक्ता टिळक, शहराध्यक्षा माधुरी मिसाळ यांच्यासह पश्चिम महाराष्ट्रातील खासदार, आमदार आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

गरीबाच्या मुखी दुध जाहले महाग …आता गाईचे दूध 58 रुपये तर म्हशीचे दूध 74 रुपये लिटर

पुणे - भेसळीच्या पनीर ने राज्यात उच्छाद मांडला असताना...

संजय गांधी नॅशनल पार्कमध्ये बेवड्यांनी लावली आग:अर्धा हेक्टर जंगल जळून खाक

मुंबई-मुंबईच्या बोरिवलीमधील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामध्ये बेवड्यांनी आग...

महाबळेश्वर पर्यटन: कार पसरणी घाटात १०० मीटर दरीत कोसळून भीषण अपघात

पुणे- लोणी काळभोर येथील तरुण महाबळेश्वर या ठिकाणी फिरण्यासाठी...

तृप्ती देसाईंना 17 तारखेला बीड पोलिस अधीक्षक कार्यालयात हजर राहण्याचे आदेश

बीड- येथील पोलिसांनी सामाजिक कार्यकर्त्या पुण्यातील तृप्ती देसाईंना...