पुणे- आज भारत बंद’ आंदोलनाच्या दिवशी पुण्यात पर्वती विधानसभा मतदार संघामध्ये बिबेवाडी,सहकारनगर, लक्ष्मीनगर,शिवदर्शन, पर्वती दर्शन, मित्र मंडळ,सारस बाग, टिळक रोड अलका टॉकीज चौकापर्यंत राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीकडून पाठिंब्यासाठी दुचाकी रॅली काढण्यात आली.त्यानंतर अलका टॉकीज चौकात होणाऱ्या निदर्शन सभेमध्ये आज पर्वती विधानसभा राष्ट्रवादीकाँग्रेसपार्टीचे सर्व पदाधिकारी, नगरसेवक व मोठ्या संख्येने कार्यकर्ते सामील झाले.
दुचाकी रॅली दरम्यान “शेतकरी विरोधी कायदा रद्द करा.. रद्द करा..” तसेच जय जवान जय किसान व “हल्लाबोल हल्लाबोल” अशा जोरदार घोषणा देण्यात आल्या.देशभरातील शेकडो संघटना आणि 22 पक्षांचा बंदला पाठिंबा असताना पर्वती मतदार संघात सुद्धा या दुचाकीरॅलीमुळे बंद पाळण्यात आल्याचे दिसून आले.
पर्वती मतदार संघाचे अध्यक्ष नितीनभैया कदम दिलीप अरूंदेकर,अश्विनी कदम, प्रिया गदादे, महेश शिंदे, शिवाजी भाऊ गदादे पाटील,मृलाणिनी वाणी,श्वेता होनराव-कामठे, आनंद बाफना, वैजनाथ वाघमारे, संतोष पिसाळ, अमोल ननावरे, समीर पवार, प्रशांत कुदळे, उषाताई घोगरे, प्रशांत कदम, रूपाली कदम, श्रीकांत मेमाने, प्रशांत शिरसागर प्रमोद संचेती, बलवंत शिवशरण
संजय दामोदरे, तुषार नांदे, अमोल ननावरे,संग्राम होनराव,संग्राम वाडकर, सचिन जमदाडे, दत्तात्रय चव्हाण, गौरव कापरे,आशुतोष बोडके,रोहित कांबळे,वैभव डोळस, गणेश दामोदरे, गणेश हनवते, साईनाथ ढावरे, सिद्धार्थ बनकर प्रदीप शिवशरण,प्रशांत किर्तै,सुशील कचरे,प्रदीप शिवशरण,महेश पवार,अमोल साळुंखे, सुमित थोपटे कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते..

