नवी दिल्ली- काळा पैसा आणि बनावट चलनाला पायबंद घालण्यासाठी मध्यरात्रीपासून हजार आणि पाचशेच्या नोटा वापरातून रद्द होणार आहेत. पुढील 50 दिवसांत म्हणजेच 30 डिसेंबरपर्यंत एक हजार आणि पाचशेच्या नोटा बँक आणि पोस्ट ऑफिसात बदलून घेता येतील अशी घोषणा आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली भारताच्या आर्थिक क्षेत्रात या निर्णयाने जणू भूकंपच झाला आहे.
काळा पैसा आणि बनावट चलनाला पायबंद घालण्यासाठी हा सर्वात जालीम उपाय ठरणार आहे.त्याचे पडसाद येत्या काळात उमटत राहतील. मोदी म्हणाले, सीमेपलीकडून शत्रू खोट्या चलनी नोटांच्या माध्यमातून भारताची अर्थव्यवस्था खिळखिळी करण्याचा प्रयत्न करतात. भ्रष्टाचार, काळं धन आणि दहशतवाद हे देशाचे मोठे शत्रू आहेत. योजनांमार्फत गरिबांपर्यंत पोचण्याचा आमचा प्रयत्न आहे.भ्रष्टाचार आणि काळं धन हे देशासमोरचं मोठं आव्हान, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.