दीपिका पदूकोण राहत असलेल्या बिल्डिंगला भीषण आग, 90 लोकांना सुखरुप बाहेर काढले

Date:

मुंबई- प्रभादेवी भागातील वीर सावरकर रोडवरील ब्यूमॉन्ड बिल्डिंगच्या 33 व्या मजल्यावर बुधवारी दुपारी दोन वाजता भीषण आग लागली. आगीची माहिती मिळताच अग्नीशमन दलाच्या 10 गाड्या आणि 3 वॉटर टँकर घटनास्थळी रवाना झाले शर्थीच्या प्रयत्नांनतर आगीवर नियंत्रण मिळवले असून सध्या कुलिंगचे काम सुरु आहे.जवळपास 90 जणांना इमारतीतून सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. वेळीच इमारतीमध्ये असलेल्यांना बाहेर काढल्यामुळे जीवितहानी टळली.

33 व्या मजल्यापर्यंत आगीच्या बंबांचा पाण्याचा मारा कसा पोहचेल ही एक समस्या होती याच कारणामुळे आग विझवण्यास काही प्रमाणात विलंब झाल्याचे सांगण्यात येत आहे.ब्यूमाँड असे इमारतीचं नाव असून बडे उद्योगपती, कलाकार व अनेक सेलिब्रिटी या इमारतीत राहतात. इमारतीच्या उंचीमुळे या मजल्यावरील आग विझवण्यास अडथळे येत असल्याचं उपस्थितांनी सांगितलं. याच इमारतीमध्ये 26व्या मजल्यावर दीपिका पादुकोणचाही फ्लॅट असल्याचं सांगण्यात आलं आहे. ब्युमॉन्ड बिल्डिंगमध्ये बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण हिचे घर आणि ऑफिसही आहे. या इमारतीच्या 26 व्या मजल्यावर दीपिकाचा 4 बीएचके फ्लॅट आहे. याशिवाय बिजनेसमॅन्सची आॅफिसेस याच बिल्डिंगमध्ये आहेत.ही आग कशामुळे लागली याबाबतची माहिती अद्याप मिळू शकली नाही.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पुणे शहराची भविष्यातील गरज लक्षात घेऊन पुरंदर विमानतळाची निर्मिती करण्यात येणार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुरंदर विमानतळ विकास कामांचा आढावा मुंबई, दि....

‘ओव्या आजीच्या’, ‘शालेय रंगभूमीसाठी नाटिका’ पुस्तकांचे प्रकाशन

पुणे : सुलभा रारावीकर लिखित ‘शालेय रंगभूमीसाठी नाटिका’ आणि...

संगीतातून ईश्वर दर्शन-पद्म विभूषण उस्ताद अमजद अली खान यांचे विचार

एमआयटी डब्ल्यूपीयूतर्फे  प्रा. डॉ. श्रीवर्धनी के. झा, खासदार ज्योथिमणी...

भारत रशियाकडून तेल खरेदी करणे थांबवेल असे रशियाला वाटत नाही:ट्रंपवर विश्वास नाही

ट्रम्प यांचा दावा- भारत रशियन तेल खरेदी करणे थांबवेल मॉस्को-रशियाने...