नागपूर- बॉलिवूडमध्ये मुस्लीम समाजाचे मोठे योगदान आहे. या योगदानाकडे दुर्लक्ष केले जाऊ शकत नाही, असे विधान राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले आहे. तसेच अल्पसंख्याकांनी सर्वच क्षेत्रात आपले योगदान दिलेले आहे, असेही पवार म्हणाले. ते नागपुरात बोलत होते.आजघडीला कला, लेखन किंवा कविता असो या सर्वच क्षेत्रात योगदान देण्याची मोठी क्षमता अल्पसंख्याकांमध्ये आहे. बॉलिवडूमध्ये आतापर्यंत सर्वाधिक योगदान कोणी दिलेले आहे? बॉलिवूडच्या प्रगतीसाठी मुस्लीम समाजाने सर्वाधिक योगदान दिलेले आहे. याकडे आपण दुर्लक्ष करू शकत नाही,” असे शरद पवार म्हणाले.
बॉलिवूडमध्ये मुस्लीम समाजाचे मोठे योगदान ज्याकडे दुर्लक्ष केले जाऊ शकत नाही-शरद पवार
Date:

