व्यावसायिक कोळसा खाण लिलावासाठी 31 कंपन्यांची बोली सादर

Date:

नवी दिल्‍ली, 28 जून 2022

कोळसा विक्रीसाठी 122 कोळसा/लिग्नाईट खाणींची लिलाव प्रक्रिया कोळसा मंत्रालयाच्या नामनिर्देशित प्राधिकरणाने  30 मार्च 2022 रोजी सुरू केली होती. 10 खाणी (परबतपूर सेंट्रल कोळसा खाण आणि 9 लिग्नाइट खाणी)) वगळता तांत्रिक बोली सादर करण्याची अंतिम तारीख 27 जून 2022 होती. लिलाव प्रक्रियेचा एक भाग म्हणून ऑनलाइन आणि ऑफलाइन बोली दस्तावेजांचा समावेश असलेल्या तांत्रिक बोली आज सकाळी 10 वाजता नवी दिल्ली येथे इच्छुक बोलीदारांच्या उपस्थितीत उघडण्यात आल्या.

ऑनलाइन बिड्स डिक्रिप्ट केल्या गेल्या आणि बोलीदारांच्या उपस्थितीत इलेक्ट्रॉनिक पद्धतीने उघडल्या गेल्या. त्यानंतर ऑफलाइन बोलीची कागदपत्रे असलेले सीलबंद लिफाफेही बोलीदारांच्या उपस्थितीत उघडण्यात आले. बोलीदारांसाठी संपूर्ण प्रक्रिया स्क्रीनवर प्रदर्शित करण्यात आली.

व्यावसायिक कोळसा खाणी लिलावाच्या तीन टप्प्यांत एकूण 38 निविदा प्राप्त झाल्या.

Sl NoName of Coal MineTrancheNo of Bids
1Bandha North5th Tranche2
2Basantpur5th Tranche2
3ChoritandTiliaya5th Tranche1
4Dahegaon/Makardhokra-IV5th Tranche2
5-6Ghogharpalli & Its Dip Extension5th Tranche7
7Datima5th Tranche1
8Dongeri Tal – II5th Tranche1
9Jitpur5th Tranche3
10Kosar Dongergaon5th Tranche1
11Mandla-South5th Tranche1
12MarkiMangli-IV5th Tranche3
13Sitanala5th Tranche1
14Sondhia5th Tranche1
15Sursa5th Tranche2
16Alaknanda2nd attempt 4th Tranche1
17-18Rampia & Dip Side of Rampia2nd attempt 4th Tranche3
19Ashok Karkatta Central2nd attempt 3rd Tranche1
20Barra2nd attempt 3rd Tranche1
21Kasta (East)2nd attempt 3rd Tranche1
22Koyagudem Block – III2nd attempt 3rd Tranche1
23Maiki North2nd attempt 3rd Tranche1
24Marki Barka2nd attempt 3rd Tranche1
 Total Bids 38

लिलाव प्रक्रियेत एकूण 31 कंपन्यांनी त्यांच्या बोली (ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही) सादर केल्या आहेत.

Sr. NoName of the BidderNo of Bids Submitted
 Auro Coal Private Limited1
 Avassa Ferro Alloys Private Limited1
 Bharat Aluminium Company Limited1
 Birla Corporation Limited1
 Cavill Mining Private Limited2
 Esskay Concast & Minerals Private Limited1
 Gangaramchak Mining Private Limited1
 Godavari Power & Ispat Limited2
 Jaiprakash Power Ventures Limited1
 Jhar Mineral Resources Private Limited2
 Jindal Power Limited1
 Jitusol Developers Private Limited1
 JMS Mining Private Limited1
 JSW Steel Limited3
 KJS Cement (I) Limited1
 Krishery Private Limited1
 Madhya Bharat Minerals Private Limited2
 Maiki South Mining Private Limited1
 Moonpie Metaliks Private Limited1
 Nagpur Business Forms Private Limited1
 NLC India Limited2
 Om Sai Ram Steels and Alloys Private Limited1
 RCCPL Private Limited1
 Rungta Metals Private Limited1
 Rungta Sons Private Limited1
 Shyam Sel & Power Limited1
 Sobhagya Mercantile Limited1
 Terri Mining Private Limited1
 Throns Infrastructure Private Limited1
 Vedanta Limited1
 YJSL Minerals and Logistics Private Limited1
 Total Bids38

बोलींचे मूल्यमापन बहु-अनुशासनात्मक तांत्रिक मूल्यमापन समितीद्वारे केले जाईल आणि तांत्रिकदृष्ट्या पात्र बोलीदारांना इलेक्ट्रॉनिक लिलावात सहभागी होण्यासाठी निवडले जाईल. तांत्रिक बोली उघडल्यानंतर कोळसा मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव आणि नामनिर्देशित प्राधिकरण (AS&NA) यांनी चर्चेसाठी मंच खुला केला . उद्योगासाठी व्यावसायिक कोळसा खाणी लिलाव अधिक आकर्षक बनवण्यासाठी त्यांनी बोलीदारांकडून सूचना मागवल्या. बोलीदारांकडून मिळालेल्या काही सूचनांवर  विचारविनिमय करण्यात आला. लिलावाच्या आगामी फेऱ्यांमध्ये सूचनांची अंमलबजावणी करण्याच्या शक्यता तपासण्याचे आश्वासन कोळसा मंत्रालयाने दिले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

‘मी’पणाचा अहंकारच पर्यावरणासाठी घातक:आचार्य प्रशांत यांचे प्रतिपादन

पुणे : 'अहंकार आणि आंतरिक अज्ञान हेच हवामान बदलांसारख्या...

अटलजींमुळे विकसित भारताची संकल्पना – विनोद तावडे

पुणे पुस्तक महोत्सवात विनोद तावडे यांच्या हस्ते 'अटलजी एक...

व्यक्त-अभिव्यक्त होण्यातील फरक समजण्यासाठी माध्यमांच्या शाळांची गरज : प्रा. प्रवीण दवणे

रोटरी साहित्य संमेलनात रंगला प्रा. दवणे यांच्याशी संवाद पुणे : व्यक्त होणे आणि अभिव्यक्त होणे, यातील फरक समजून घेण्यासाठी, आता माध्यमांच्या शाळांची गरज आहे, असे परखड मत प्रसिद्ध लेखक, कवी आणि रोटरी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रा. प्रवीण दवणे यांनी व्यक्त केले. समाजमाध्यमांसह सर्वच माध्यमे कशी हाताळावीत, त्यावर काय बघावे, कसे, किती बघावे, हे शिकवण्याची वेळ आली आहे, असेही ते म्हणाले. रोटरी मराठी साहित्य संमेलनाच्या दुसऱ्या सत्रात प्रा. दवणे यांच्याशी महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी यांनी संवाद साधला. यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात रसिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात ही मुलाखत रंगली. प्रा. दवणे म्हणाले, शालेय वयापासून ग्रंथालयांमुळे शब्द, कविता, भाषांचे महत्त्व आणि आवड जोपासली गेली. सुरुवातीचे लेखन साभार परत येत असे. पण तो अपमान अथवा कमीपणा न समजता, अधिक चांगले, अधिक आशयपूर्ण लिहिण्याची ती संधी आहे, हे सांगणारे वडीलधारे होते. त्यामुळे सुधारण्याची, शिकण्याची प्रक्रिया सुरू राहिली आणि लेखनाचा रियाज करता आला. कथामालेसारख्या उपक्रमांतून कुसुमाग्रज, बोरकर, वसंत बापट, वसंत देसाई आदी मान्यवर भेटत राहिले. तेव्हाची पाठ्यपुस्तके ही गुणांपुरती नव्हती, ती जीवनपुस्तके होती. कागदावरच्या उत्तीर्णतेपेक्षा काळजावर कोरलेल्या शब्दांचा, निष्ठांचा तो काळ होता. नेमून दिलेले काम पूर्ण निष्ठेने आणि समर्पित वृत्तीने करण्याची सवय होती. आताच्या काळात झालेला फरक त्यामुळे पटकन जाणवतो. आजच्या शिक्षकांनी आणि पालकांनी आपापली प्रगतीपुस्तके पुन्हा तपासण्याची वेळ आली आहे, असे ते म्हणाले रंजन, अंजन आणि सृजन या त्रिसूत्रीचा वापर करा बालसाहित्याविषयी भाष्य करताना दवणे यांनी रंजन, अंजन आणि सृजन या त्रिसूत्रीचा वापर करण्याचा सल्ला दिला. मुलांच्या वयानुरूप असणाऱ्या जाणिवा, संवेदना, वृत्ती, उत्सुकता, जिज्ञासा, आनंद यांचे भान ठेवून लेखन करणे आवश्यक आहे. स्वतःचे बालपण आठवून आजच्या मुलांसाठी लिहिण्यापेक्षा आजच्या मुलांचे भावविश्व आधी समजून घेऊन, मग लेखन करण्याची गरज आहे, असेही ते म्हणाले. मुलांना अकाली प्रौढ करून त्यांचे बोन्साय करू नका, असे कळकळीचे आवाहनही त्यांनी केले. एआयविषयी...

स्थानिकच्या निवडणुकांमध्ये सत्ताधाऱ्यांकडून पैशाचा प्रचंड वापर, आघाडीचा निर्णय स्थानिक नेतृत्व घेईल: रमेश चेन्नीथला.

राज्यात कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा, उडता महाराष्ट्र करण्याचा प्रयत्न, राज्यात...