पुणे :
अखिल भारतीय सेना पुणेच्या वतीने पक्ष प्रमुख आमदार अरुण गवळी व गीता गवळी यांचा वाढदिवस आगळ्या-वेगळ्या स्वरूपात साजरा करण्यात आला. विशेष विद्यार्थी आणि अनाथ मुलांच्या शाळांमध्ये तसेच आश्रमात वाढदिवसानिमित्त केक कापण्यात आला. विद्यार्थ्यांना वह्या, बेडशिट, खाऊ, फळे यांचे वाटप करण्यात आले, अशी माहिती पक्षाचे पुणे शहर अध्यक्ष देवेंद्र धायगुडे यांनी दिली.
यामध्ये ‘जनसेवा आश्रम’ (भिलारेवाडी, कात्रज), ‘श्री साईसेवा विशेष विद्यार्थी विद्यालय’ (शिवणे), ‘श्री छत्रपती प्रतिष्ठान संचालित निवासी विशेष विद्यार्थी विद्यालय’ (हिंगणेखुर्द, सिंहगड रोड), ‘हिरे हायस्कूल’ (पर्वती) यांचा समावेश होता.
यावेळी शनी शिंगारे (पुणे जिल्हाअध्यक्ष), सत्यभामा आवळे (महिला पुणे जिल्हाअध्यक्ष), यशस्विनी नवघणे (महिला शहर अध्यक्ष), महेश देवकुळे (कार्याध्यक्ष पुणे शहर), सागर पारिटे (संपर्क प्रमुख पुणे शहर), सागर मोहीते (उपाध्यक्ष पुणे शहर), ईरफान मुल्ला (सचिव पुणे शहर), समिर पवार (सचिव), भाग्यश्री जेऊर (महिला संघटक पुणे), नाशिर नलगर, सागर माणे, ऊमा गायकवाड, अंकुश कसबे, किरण लोंढे, जितेंद्र पोतदार, ज्योती शेलार, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
पक्षाच्या राष्ट्रीय सरचिटणीस आशा गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाचे संयोजन पुणे शहर अध्यक्ष देवेंद्र धायगुडे यांनी केले होते.
वाढदिवसानिमित्त लावण्यात येणारे शुभेच्छांचे बॅनर, फुलांचे गुच्छ, आतिषबाजी यावर होणारा खर्च टाळून विद्यार्थ्यांना उपयोगी वस्तुंचे वाटप करणे हा या कार्यक्रमाचा प्रमुख हेतू होता, असे देवेंद्र धायगुडे यांनी सांगितले.