महेश कोठारेंच्या ‘दख्खनचा राजा जोतिबा’ मालिकेचा भूमिपूजन सोहळा कोल्हापूर चित्रनगरीत संपन्न, लवकरच प्रत्यक्ष चित्रीकरण होणार सुरू

Date:

दख्खनचा राजा जोतिबाच्या महात्म्यावर आधारित “दख्खनचा राजा जोतिबा’ ही मालिका आता लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या आगामी मालिकेचा भूमिपूजन सोहळा नुकताच कोल्हापूर चित्रनगरीत पार पडला. महेश कोठारे यांच्या हस्ते सेट उभारणी कामाचे भूमिपूजन झाले.

कोल्हापूर चित्रनगरीत सलग चार वर्षे मालिकेचे शुटिंग सुरू राहणार आहे. यासाठी चित्रनगरीत भव्य सेट उभारला जाणार असून त्याचा भूमिपूजन समारंभाला निर्माता महेश कोठारे, नीलिमा कोठारे, अभिनेता आदिनाथ कोठारे, अभिनेत्री उर्मिला कोठारे, कला दिग्दर्शक संतोष फुटाणे, चित्रनगरीचे व्यवस्थापकीय संचालक संजय पाटील उपस्थित होते. कोठारे व्हिजन्सचं कोल्हापूरशी तसं खूप जुनं व घट्ट नातं आहे. ज्योतिबाचं देवस्थानदेखील या कोल्हापूर नगरीत आहे त्यामुळेच मालिकेचं शूटिंगही कोल्हापुरात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.याविषयी महेश कोठारे म्हणाले, “कोल्हापूर ही माझी कर्मभूमी आहे. कोल्हापुरातूनच अनेक सिनेमे आणि मालिका केल्या आणि एकूणच करियरला कलाटणी मिळाली. कोठारे व्हिजन संस्थेच्या माध्यमातून आजवर पौराणिक मालिकांवर भर देण्यात आला असला तरी जोतिबाची मालिका आणखी उंची गाठेल. भव्य सेटबरोबरच मालिकेसाठी वेशभूषा, विविध अलंकार या अतिशय महत्वाच्या गोष्टी असून ही मालिकाही अनेक नवे ट्रेंड निर्माण करेल. कलाकारांची नावे लवकरच जाहीर केली जातील.’कोल्हापुरात संपूर्ण मालिका शुटिंग करण्यासाठी काही तांत्रिक अडचणी होत्या. कोल्हापूर चित्रनगरीत आता सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध झाल्याने या मालिकेचे येथे शुटिंग शक्‍य झाले आहे. शुटींग पूर्ण होताच रोजचे एपीसोड चित्रनगरीतून थेट मुंबईतील स्टुडिओमध्ये अपलोड होणार आहेत. त्यासाठी पालकमंत्री सतेज पाटील, सांस्कृतिक राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांचेही सहकार्य मिळाल्याचे त्यांनी सांगितले. मालिका स्टार प्रवाह प्रस्तुत कोठारे व्हिजन्सची निर्मिती आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

बौद्ध धम्म हा मनःशांती ते विश्वशांती चा प्रतीक ~ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

बुद्धगया : भगवान गौतम बुद्धांनी आखिल मानवजातीच्या कल्याणासाठी...

नेपाळमध्ये बस महामार्गावरून नदीत कोसळली, 18 ठार:25 जखमी

काठमांडू:नेपाळमधील धादिंग जिल्ह्यात सोमवारी रात्री उशिरा एक बस महामार्गावरून...

हवामान विभागाचा 7 जिल्ह्यांना ‘येलो अलर्ट’,विदर्भात पावसाचा धुमाकूळ, तर कोकणात आंबा धोक्यात

मुंबई:रविवारी मध्यरात्रीपासून विदर्भातील नागपूर, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यांत विजांच्या...