धर्मिक व शिल्पकलाकृतीचा अदभूत अविष्कार असलेले भव्य शिव मंदिर भुलेश्वर बनले अभ्यासकांचे केंद्र !

Date:

index2 index3
पुणे (विजयकुमार हरिश्चंद्रे )
धर्म अर्थ आणि विज्ञान दृष्ट्या  संस्कृतीच्या अनेक परंपरेच्या अनेक वाटा या मंदिरवास्तुं व प्राचीन ऐतिहासिक शिल्प कलाकृतीतून निर्माण झाल्या असून गतकालीन मंदिर शिल्पकलेचे साहित्य अभ्यासणाऱ्या काही मंदिरां पैकी भुलेश्वरचे  पर्यटन व आध्यत्मिक दृष्ट्या अभ्यासकांना आकर्षण वाढल्याचे दिसून येत आहे .    शिवरात्र   निमित्त भाविक भक्त आणि अभ्यासकांचे  हे मंदिर  आकर्षण बनले आहे.
या मंदिराची वास्तूशैली  दक्षिणेकडील होयसळ मंदिरप्रमाणे आयताकृती व पाकळ्या सदृश आहे हेमाडपंती मंदिरांच्या तुलनेत या मंदिरातील शिल्परचना अधिक उच्च प्रतीची असून शिल्प दर्शनाच्या माध्यमातून रामायण ,महाभारत ,युद्ध कौशल्य संस्कृतीचे विविध पैलू पाहण्यास मिळतात इतकेच न्हवे  तरतत्कालीन निसर्ग पर्यावरण आणि वन्यजीव संपदा शिल्पचित्र द्वारे दृष्टीस येतो पूर्वाभिमुख असलेल्या या मंदिराची प्राकाराराची रचना उत्तरेतील जैन मंदिराच्या धर्तीवर आहे या मंदिराची मूळ बांधणी तेराव्या शतकातली असून सोभावतालच्या भिंत ,नगारखान व शिखरे अठ्ठराव्या शतकातील मराठा शैलीतील आहेत .येथील शिवालयातील अदभूत घटना म्हणजे  शिवलिंगास दाखविलेला  पेढे प्रसाद रहस्यमय रित्या गायब होतो व उर्वरित प्रसाद भाविकांना मिळतो अशी आख्यायीका असल्या मुळे या मंदिरास नवसपुर्तीची देवता म्हणूनही भाविकांची समजूत आहे या बद्दलच्या अनेक दंतकथाही सांगितल्या जातात श्रावणात या शिवलिंगास महाभिषेक करून विविध आकर्षक फुलांची सजावट केली जात असते  या शिवाल्यास भुलेश्वर अथवा यवतेश्वर  म्हणूनही संबोधले जाते या मंदिरात मोठ्या प्रमाणावर मानवी देवदेवतांची शिल्पे असून तत्कालीन सांस्कृतिक कलात्मक नृत्यांगना  सहवाद्य व्यक्तिमत्व अश्या तत्कालीन वास्तव वैभव मूर्ती स्वरुपात पहावयास मिळते परंतु काही अभद्र  प्रवृतीकडून या आकलन सुंदर शिल्प समूहाची इथास कालीन तोडमोड झाल्याचे लक्षात येते येथील प्रशासन व भोगोलिक परस्थिती मुळे हे मंदिर अजाणतेपणे नजरेआड होत आहे या मोल्यवान शिल्प खजान्याच्या रक्षणाकरिता पुरातत्व विभाग पुढे सरसावले असून येथील धर्मिक अध्यात्मिक परंपरेची जोपासना गुरव समजाकडून उत्तम जोपसली जात असल्याचे चित्र दिसून आले  या शिल्प संस्कृतीच्या अभ्य्सा करिता विवध राज्यातून मूर्तीअभ्यासक पर्यटक तर धार्मिक अनुष्ठाना करिता अनेक दिग्गज येत असल्याचे मंदिर अभ्यासक  जेष्ठ लेखक मधुकर टांकसाळे यांनी सांगितले आजच्या युगातील थ्रीडी चित्रकल संस्कृती मात्र हजारो वर्षापूर्वी  या मंदिराच्या दगडावरील केलेल्या कोरीव कलेतून पहाण्यास मिळतात  असे  युद्ध प्रसंगही भित्ती शिल्पातून दिसतात .ब्रह्मेंद्रस्वामिनी माळशिरस व यवत मध्ये विहिरी व टाळावे बांधून दिली व येथील मंदिराचे वास्तव चित्र जपण्याचा प्रयत्न केला गेल्याची माहिती मंदिर पुजारी विनय गुरव यांनी दिली अश्या शिल्प संस्कृतीच्या शिव मंदिर ला विविध इतिहासाचा आधार लाभल्याची नोंद  आढळते

 

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक धनकवडे उद्या करणार भाजपात प्रवेश

पुणे-केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि आमदार भीमराव तापकीर यांच्या...

पुणे, पिंपरीत भाजपचा महापौर होईल,भाजप राज्यात एक क्रमांकावर राहील-मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

पुणे -आगामी नगरपरिषद निवडणुकीत भाजप राज्यात एक क्रमांकावर राहील,...

‘भाजपा-शिवसेना पुणे महापालिका एकत्र लढणार’

शिवसेनेसोबत बैठकीनंतर केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांची माहिती पुणे, ...

काँग्रेसमध्ये इनकमिंग जोरात, मिरा भाईंदरमध्ये वेंचर मेंडोंसा व तारेन मेंडोंसा यांचा काँग्रेस पक्षात प्रवेश.

भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका, महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेसला विजयी...