पुणे- पुण्यात भीमथडी जत्रेची सुरवात झाली आहे. भीमथडीचे आज 11 व्या वर्षात पदार्पण झाले. माननीय खासदार सुप्रिया सुळे ह्यावेळी उपस्थित होत्या त्यांनी कारागिरांशी संवाध साधला.ह्यावेळी कारागीरांचे २५ स्टॉल भीमथ़डी मध्ये पहावयास मिळाले. तसेच अॅग्रीकल्चरल डेवपलपमेन्ट ट्रस्ट, बारमतीच्या सौ. सुनंदा पवार देखील ह्यावेळी उपस्थित होत्या.सुनंदा पवार यांच्या कल्पक आणि नाविन्यपूर्ण कृतीशील मार्गदर्शातून, मेहनतीतून ‘भीमथडी जत्रा’ हा अभिनव उपक्रम नावरूपाला आला आहे. ही जत्रा २ ते ५ मार्च पर्यंत अॉग्रीकल्चरल ग्राऊंड, सिचंननगर, पुणे येथे होणार आहे.