असं म्हणतात सोबत चांगली असली की प्रवासपण चांगला होतो. लांबचा प्रवास, खिडकी जवळची जागा, खिडकीतून दिसणारा पाऊस आणि चांगली सोबत असणं म्हणजे एका परफेक्ट प्रवासाचं परफेक्ट वर्णन. या प्रवासादरम्यान अनेक कथा सुरु झाल्या, काही हुरहूर लावणाऱ्या तर काही आयुष्यभराची सोबत करणाऱ्या! ‘भेटली तू पुन्हा’ या चित्रपटाचे पोस्टर पाहिले की प्रत्येकालाच आपापल्या हुरहूर लावणाऱ्या, नॉस्टॅल्जिक करणाऱ्या आठवणी आठवतील.
स्वरूप रिक्रिएशन अँड मिडिया प्रा. लि. प्रस्तुत आणि चंद्रकांत कणसे दिग्दर्शित ‘भेटली तू पुन्हा’ या चित्रपटाच्या पोस्टरवरून ‘बबली गर्ल’ भासणाऱ्या पूजा सावंत आणि ‘टॉल अँड हँडसम’ वैभव तत्ववादी यांची नवीन खुमासदार जोडी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे हे कळते. पोस्टरमध्ये दाखवलेला रेल्वे प्लॅटफॉर्म, रोमँटिक पाऊस, इंद्रधनुष्याचा फील देणारा पूजाचा स्कर्ट आणि पूजा व वैभव यांच्या चेहऱ्यावरचे मिश्कील भाव यामुळे त्यांच्या या प्रवासाबद्दलची उत्सुकता वाढत आहे.
पहिल्या नजरेत होणारे प्रेम आता खूप टिपिकल झाले आहे, दुसऱ्या भेटीत फुलत जाणारे प्रेम अनुभवायचे असेल तर मग येत्या २८ जुलैला ‘भेटली तू पुन्हा’प्रदर्शित होत आहे .

