भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता कार्यक्रम भार्थी  शेतकऱ्यांच्या मेळाव्याचे आयोजन

Date:

पुणे दि.१४- भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंतीनिमित्त सहायक आयुक्त समाज कल्याण कार्यालयाद्वारे सामाजिक न्याय भवन येथे कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभीमान योजनेअंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले.

कार्यक्रमाला प्रादेशिक उपायुक्त कार्यालयातील सहायक संचालक लेखा व वित्त मारुती मुळे, समाज कल्याण अधिकारी मीना अंबाडेकर,  सहायक आयुक्त संगीता डावखर, डॉ.गौतम बंगाळे, मल्लिनाथ हरसुरे, दिपाली ढोरजे आदी उपस्थित होते.

यावेळी डॉ.बंगाळे यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या तर श्री.शेटे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवन आणि कार्यावर व्याख्यान दिले.

गणेश केळगंद्रे या विद्यार्थ्याने ‘डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे शेतीविषयक विचार’ या विषयावर विचार व्यक्त केले, तर मनोज भोईवार याने बासरी वादनाद्वारे भीमगिते सादर केली.

प्रास्ताविकात श्रीमती डावखर यांनी कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभीमान योजनेची माहिती दिली. त्यांच्या हस्ते ‘पुणे विद्यापीठाच्या नामकरणाचा प्रेरणादायी इतिहास’ आणि  ‘बाबासाहेबांची पत्रकारिता’ या पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी योजनेच्या लाभार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

घरगुती करदात्यांसाठी शास्ती कर २% वरून १% करावा:नगरसेवक हर्षवर्धन मानकर यांची मागणी

पुणे : पुणे महानगरपालिका हद्दीतील सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देण्यासाठी,...

जुगाड भारतीय संशोधनाची विशेषता- केम्ब्रीज विद्यापीठाचे प्रा. जयदीप प्रभू

फ्यूल मध्ये लीन स्पार्कचे प्रकाशन पुणे, दि. २६ मार्च:...