पुणे-” जेल मध्ये टाका परंतु सर्व सामान्य नागरिकांचे पाणी आडवू नका ” अशीआक्रमक भूमिका घेत आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी च्या वतीने,भामा आसखेड प्रकल्पाचे आरक्षण रद्द केल्याच्या कारणास्तव जेलभरो आंदोलन करण्यात आले.यावेळी केवळ राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस ने भामा आसखेड च्या पाण्याची योजना पुण्यासाठी राबविली म्हणून आता ते पाणीच पुण्याला द्यायचे नाही अशी भूमिका घेणारे भाजप सरकार हे घातकी सरकार आहे अशा पद्धतीने नागरिकांच्या पिण्याच्या पाण्यावर देखील दरोडा घालणे उचित नाही अशी टीका यावेळी राष्ट्रवादीकडून करण्यात आली काही दिवसांपुर्वीच भामा आसखेड धरणातून पुण्याला पिण्याचे पाणी देणार नाही अशी भूमिका घेतल्यानंतर राष्ट्रवादीने या प्रकरणी आता आक्रमक भूमिका घेण्याचे ठरविले आहे . या पार्श्वभूमीवर आंदोलाकाहून दुप्पट संख्येने पोलीस बंदोबस्त येथे तैनात करण्यात आला होता . भर उन्हात नागरिकांनी अत्यंत शांततामय पद्धतीने हे आंदोलन केले
या वेळी माजी आमदार बापूसाहेब पठारे, विरोधीपक्ष नेते चेतन तुपे, नगरसेवक महेंद्र पठारे, भैयासाहेब जाधव, नगरसेविका सुमनताई पठारे, संजिलाताई पठारे, सामाजिक कार्यकर्ते आशिष माने, मनोज पाचपुते व परिसरातील पक्षाचे नेते-कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या संख्ये ने उपस्थीत होते.आंदोलनानंतर पोलिसांनी या सर्वांना पोलीस गाडीत घालून ताब्यात घेतले .