लखनऊ – लखनौकडे रवाना झालेले राहुल गांधी, सीतापूर इथं बंदिस्त असलेल्या प्रियंका गांधी तसंच इतर तीन काँग्रेस नेत्यांना लखीमपूर खेरी इथं भेट देण्याची परवानगी आता देण्यात आली आहे. उत्तरप्रदेश सरकारच्या गृहमंत्रालयाने याविषयीची माहिती दिली आहे.राहुल गांधी एकीकडे लखनऊ विमानतळ येथे पोहोचत असताना च प्रियांका गांधीनची अटकेतुन सुटका करण्यात आली आहे .दुपारी 1-34 वा. राहुल यांचे विमान लखनऊ ला पोहोचले, आणि प्रियांका ची सुटका झाली या दोन्ही बातम्या एकाच वेळी आल्या. अगोदर राहुलना लखनऊ बंदी करण्यात आली होती.
लखीमपूर अपडेट:दोन दिवसानंतर अखेर प्रियंका गांधींची सुटका; राहुल गांधींसह प्रियंकांना देखील मिळाली लखीमपूरला जाण्याची परवानगी
नवी दिल्ली2 तासांपूर्वी

लखीमपूरच्या घटनेनंतर घटनास्थळी जाण्यासाठी निघालेले काँग्रेस नेते राहुल गांधी यांना सीतापूर, लखीमपूरला जाण्याची परवानगी मिळाली आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी बुधवारी अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन हा निर्णय घेतला. त्यानुसार, राहुल गांधी यांना सीतापूरला जाताना कार्यकर्त्यांना सोबत घेऊन जाता येणार नाही. ते केवळ 3 जणांना आपल्या सोबत घेऊन सीतापूरमध्ये दाखल होऊ शकतात.
तर दुसरीकडे दोन दिवसांपासून ताब्यात असलेल्या काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांची सुटका करण्यात आली आहे. शेतकऱ्यांना चिरडणारे मोकाट फिरत आहेत. तर त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी लढणाऱ्यांना अटक करण्याचे काम भाजप सरकारकडून सुरू आहे. तरीही आम्ही शेतकऱ्यांच्या हक्कासाठी लढत राहू असे ट्विट प्रियंकांनी केले आहे.
राहुल गांधी सीतापूरला फ्लाइटमध्ये तर सचिन पायलट रस्ते मार्गे निघाले. पायलट यांना यावेळी दिल्ली-लखनऊ राष्ट्रीय महामार्गावर रोखण्यात आले.
आरोपीला अटक होण्याची शक्यता
याच दरम्यान लखीमपूर खिरीचा आरोपी आशीष मिश्र याला लवकरच अटक केली जाऊ शकते. आशीषचे वडील आणि केंद्रीय मंत्री अजय मिश्र यांनी बुधवारी गृह राज्य मंत्रालयाचे ऑफिस गाठले. यानंतर त्यांच्या मुलाच्या अटकेच्या शक्यता आणखी वाढल्या. शेतकऱ्यांना चिरडल्या प्रकरणी विविध शेतकरी संघटना आशीषच्या अटकेची मागणी करत आहेत.
उत्तर प्रदेशातील लखीमपूर खिरी येथे आंदोलक शेतकऱ्यांना केंद्रीय मंत्र्याच्या मुलाने कारखाली चिरडले. त्या घटनेच्या विरोधात निषेध व्यक्त करण्यासाठी तसेच शेतकऱ्यांशी संवाद साधण्यासाठी गेलेल्या काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी वाड्रा यांनाही ताब्यात घेण्यात आले होते. त्यानंतर देशभरातून प्रतिक्रिया उमटल्या. शरद पवारांनी या घटनेची तुलना थेट ब्रिटिश काळातील जालियानवाला बाग हत्याकांडाशी केली. तर राहुल गांधी यांनी या घटनेचा संदर्भ घेऊन देशात सध्या हुकूमशाही कारभार सुरू असल्याचे म्हटले आहे.

