३० जानेवारीपर्यंत स्वहस्ताक्षरात प्रतिज्ञा लिहून पाठवावी
पुणे : जागतिक हस्ताक्षर दिनानिमित्त अक्षर रसिक सुलेखन वर्ग व सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट यांच्या संयुक्त विद्यमाने सुंदर हस्ताक्षर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेमध्ये सर्व वयोगटातील लोकांना सहभागी होता येईल. मराठी, इंग्रजी किंवा हिंदी यापैकी कोणत्याही भाषेत ‘भारत माझा देश आहे’ ही प्रतिज्ञा लिहून पाठवायची आहे. सहभाग घेणाऱ्या प्रत्येकाला प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. तसेच उत्कृष्ट हस्ताक्षरास आकर्षक बक्षिसे दिली जाणार आहेत. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी ३० जानेवारी २०२१ पर्यंत आपल्या हस्ताक्षरातील लेखन ९८८१००१७९० या क्रमांकावर पाठवायचे आहे.
सुंदर हस्ताक्षर ही देवाने दिलेली देणगी असून, आपले सौंदर्य हस्ताक्षरामुळे अधिक खुलून दिसते. त्यामुळे झोकून देऊन काम करण्याची व हस्ताक्षावर मेहनत घेण्याची तयारी हवी. सुंदर हस्ताक्षरामुळे आत्मविश्वास, इच्छाशक्ती, नीटनेटकेपणा अंगी बानवण्यास मदत होते, असे समर्थ रामदासांनी ३५० वर्षांपूर्वी दासबोधातून सांगितले आहे.
सुंदर हस्ताक्षर स्पर्धेचे आयोजन
Date:

