पुणे : स्थानिक पातळीवर लोकप्रतिनिधींचा मत दारांशी प्रत्यक्ष संपर्क येतो असतो, विकास कामे करत असताना, नागरिकांना अपेक्षित आणि हवी असणारी विकास कामे करावीत, त्यामध्ये सातत्य ठेवून स्थानिक पातळीवरील निधी पायाभूत सुविधांसाठीच वापरला गेला पाहिजे,असा आग्रह आमदार माधुरी मिसाळ यांनीकेला.

धनकवडी, संभाजीनगर येथील ह.भ.प.शहाडे उद्यानाचे सुशोभीकरण नुकतेच करण्यात आले, यामध्ये छत्रपती संभाजी महाराज वाचनालय, लेझर फाऊंटन आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र उभारण्यात आले आहे. यांचा लोकापर्ण सोहळा आमदार माधुरी मिसाळ यांच्या हस्ते संपन्न झाला यावेळी आमदार माधुरी मिसाळ बोलत होत्या.
नगरसेवक महेश वाबळे यांच्या प्रयत्न आणि संकल्पनेतून साकारलेल्या हभप शहाडे उद्यानातील हिरवळ आणि रंगबेरंगी पाण्यावर उमटलेले लेझर फाउंटनचे प्रतिबिंबमन मोहून टाकत होते, नागरिकांच्या आकर्षणाच्या केंद्रबिंदू ठरलेल्या लेझर फाउंटनची प्रतिमा मोबाईल मध्ये घेण्या साठी तरुणाईमध्ये चढाओढ लागली होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सुशोभीकरण कामाची माहिती नगरसेवक वाबळे यांनी दिली.
यावेळी प्रशांत थोपटे, विश्वास ननावरे, हरिष परदेशी, प्रशांत दिवेकर, संगीता चौरे, मालती अवघडे, प्रसाद शहाडे, अनिल जाधव, कैलास मोरे, संध्या नांदे, मंदार रांजेकर उपस्थित होते.

