राज्यातील कायदा – सुव्यस्था आहे कुठे?
पुणे- बारामतीतील हत्येच्या प्रकरणाने अजितदादा पवार खवळले आहेत त्यांनी पहा काय म्हटले आहे …..
बारामतीत मंगळवारी दिवसाढवळ्या एका युवतीची डोळ्यात तिखट टाकून हत्या करण्यात आली. या घटनेचा आम्ही तीव्र निषेध करतो. काल साधारण पाच वाजण्याच्या सुमारास ही युवती आपल्या वडिलांबरोबर मोटरसायकलवरून जात असताना काही लोकांनी त्यांना अडवून मुलीच्या डोळ्यांत तिखट टाकले आणि तिची हत्या केली. तसेच तिच्यासोबत असणाऱ्या तिच्या वडिलांना जखमी करण्यात आले. दिवसाढवळ्या अशा घटना घडत असतील तर या राज्यात कायदा आणि सुव्यवस्था आहे की नाही? असा प्रश्न यामुळे उपस्थित झाला आहे. मानवतेला काळीमा फासणाऱ्या अशा घटनांची दखल गांभीर्याने घेतली जाणार की नाही, सरकार काय करत आहे, असे प्रश्नदेखील यामुळे चर्चेत आले आहेत.
त्यामुळे राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्या या घटनेबाबत स्थगन प्रस्ताव स्वीकारावा अशी मागणी आज सभागृहात केली. मात्र हा प्रस्ताव विधानसभा अध्यक्षांनी फेटाळला. तरीही घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन या प्रश्नाबाबत सरकारने निवेदन सादर करावे, असे निर्देश अध्यक्षांनी दिले आहेत. सरकार याबाबत सोमवारी सभागृहात निवेदन सादर करणार आहे.
—- अजित पवार

