पुणे- पुणे तिथे काय उणे म्हणतात या उक्तीचा प्रत्यय यावा , अशा नवनवीन कल्पना ,योजनांना इथून सुरुवात होते, अशीच एक नवीन अभिनव योजना आता इथून सुरु होती आहे ती म्हणजे ‘२४ तास जनसेवा ‘ केंद्र … निंबाळकर तालीम चौकात राघवेंद्र उर्फ बाप्पू मानकर या नवयुवक कार्यकर्त्याने हे केंद्र सुरु करण्याचा ध्यास घेतला आहे . हे नुसते जनसंपर्क कार्यालय नसेल , इथून वंचितांना , अडलेल्या नडलेल्या गरजूंना आवश्यक ती मदत आणि सहाय्य करण्यासाठी २४ तास राबणारे हाथ बाप्पू पुढे आणणार आहे . रात्रीची वेळ आहे ,म्हणून ‘हे’झाले नाही,’हे’ होऊ शकत नाही असे होता कामा नये . आरोग्य ,आणि मुलभूत सेवा प्राप्त करवून घेण्यासाठी नागरिकांना येथून थेट मदत कशी पुरविता येइल या साठी बाप्पुंच्या मित्रांचा संच येथे कार्यरत राहणार आहे . वय वर्षे अवघे ३४ , आणि अशा वयात जनसेवेचे हे प्रसंगी संघर्षदायी ठरणारे व्रत घेणारी हा तरुण आणि त्याची मित्रमंडळी या कल्पनेतून कार्यरत होणार आहे . या जनसेवा केंद्राचे उद्घाटन पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते येत्या २७ तारखेला होणार आहे . कोणाच्या आजारपणाची दाखल घेवून धावाधाव करून उपचारापर्यंत संबधितांना पोहोचविणे,कोणाच्या दुखद घटनेची वार्ता वेळीच पोहोचविणे,मुलभूत सेवां अभावी होणाऱ्या अडचणीतून नागरी जीवन सावरणे ,अपघात ग्रस्तांना मदत करणे अशी विविध आवाहने त्यांच्या पुढे ठाकणार आहेत .
२४ तास जनसेवा केंद्र ;पुण्यात आजपासून ….
Date: