पुणे- १८६६ -६७ साली ज्यांनी बंडगार्डन पुलाच्या बांधणीसाठी योगदान दिले त्या महात्मा ज्योतिबा फुले यांचे नाव या पुलाला देण्याचा ठराव संमत होवूनही अद्याप या पुलाचे नामकरण करण्यात आलेले नाही . येत्या ११ तारखेला महात्मा फुले जयंती आहे . या दिवशी तरी समारंभ पूर्वक या पुलाचे नामकरण करावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते योगेश पिंगळे यांनी केली आहे .


२०१६ मध्ये बंडगार्डन पूल आर्ट प्लाझा या नावाने या पुलाचा सुरेख कायापालट करण्यात आलेला आहे. तत्पूर्वी २०११पासून या पुलास महात्मा ज्योतिबा फुले यांचे नाव द्यावे या साठी पिंगळे आग्रही आहेत . दरम्यान २३ फेब्रूवारी २०१८ रोजी १०४२ क्रमांकाच्या ठरावान्वये पालिकेच्या मुख्य सभेत तसा ठराव देखील सर्वानुमते संमत झाला आहे .येत्या ११ एप्रिल च्या फुले जयंतीच्या औचित्याने या पुलाचे नामकरण करावे अशी मागणी योगेश पिंगळे यांनी केली आहे .

