‘बजाज इलेक्ट्रिकल्स’ची दुसऱ्या तिमाहीत उत्तम आर्थिक कामगिरी

Date:

ग्राहकोपयोगी उत्पादन (सीपी) विभागाच्या महसुलात 12.9 टक्के, तर करपूर्व उत्पन्नात 159 टक्के वाढ, करपूर्व नफा वाढला 102 कोटी रुपयांनी.

‘बजाज इलेक्ट्रिकल्स लिमिटेड’ने 30 सप्टेंबर 2020 रोजी संपलेल्या सहामाहीचा आणि तिमाहीचा आर्थिक निकाल जाहीर केला आहे.

2020-21 या आर्थिक वर्षातील दुसऱ्या तिमाहीत कंपनीने आपल्या कामकाजातून 1,218 कोटी रुपयांची विक्री केली / उत्पन्न कमावले. मागील वर्षीच्या दुसऱ्या तिमाहीतील 1,096 कोटी रुपयांच्या उत्पन्नापेक्षा यंदाचे हे उत्पन्न 11.1 टक्क्यांनी अधिक आहे. यंदाच्या तिमाहीत कंपनीने 73 कोटी रुपयांचा करपूर्व नफा आणि 53 कोटींचा करपश्चात नफा कमावला आहे. मागील वर्षी दुसऱ्या तिमाहीत कंपनीला 29 कोटी रुपयांचा करपूर्व तोटा आणि 33 कोटींचा करपश्चात तोटा झाला होता.

या तिमाहीमध्ये ग्राहकोपयोगी उत्पादनांच्या (सीपी) विभागात, कंपनीने 792 कोटी रुपयांचा एकूण महसूल मिळवला. गेल्या वर्षीच्या तिमाहीत तो 702 कोटी रुपये होता. म्हणजे, यंदाच्या महसुलात 12.9 टक्क्यांची वाढ झाली. ‘सीपी’मध्ये करपूर्व नफा 85 कोटी रुपयांचा झाला. गेल्या वर्षीच्या 33 कोटींच्या तुलनेत यंदा ही वाढ 159 टक्क्यांची झाली. सीपी विभागाची ऑपरेटिंग मार्जिन्स 10.7 टक्के आहेत. इपीसी विभागात कंपनीने 425 कोटी रुपयांचे एकूण उत्पन्न मिळवले. गेल्या वर्षीच्या तिमाहीतील 394 कोटींच्या तुलनेत त्यात यंदा 8 टक्के वाढ झाली. इपीसी विभागाने यंदा 7 कोटींचा करपूर्व नफा कमावला. गेल्या वर्षी या विभागाला 18 कोटी रुपयांचा तोटा झाला होता.  

सध्याच्या आर्थिक वर्षात 30 सप्टेंबर 2020 रोजी संपलेल्या सहामाहीमध्ये कंपनीने आपल्या कामकाजातून 1,826 कोटी रुपयांची विक्री केली / उत्पन्न कमावले. मागील वर्षीच्या दुसऱ्या सहामाहीतील 2,403 कोटी रुपयांच्या उत्पन्नापेक्षा यंदाचे हे उत्पन्न 24 टक्क्यांनी कमी आहे. यंदाच्या सहामाहीत कंपनीने 41 कोटी रुपयांचा करपूर्व नफा आणि 37 कोटींचा करपश्चात नफा कमावला आहे. मागील वर्षीच्या सहामाहीत कंपनीला 6 कोटी रुपयांचा करपूर्व तोटा आणि 19 कोटींचा करपश्चात तोटा झाला होता.

या सहामाहीमध्ये ग्राहकोपयोगी उत्पादनांच्या विभागात, कंपनीने 1,187 कोटी रुपयांचा एकूण महसूल मिळवला. गेल्या वर्षीच्या सहामाहीत तो 1488 कोटी रुपये होता. म्हणजे, यंदाच्या सहामाहीत महसुलामध्ये 20.2 टक्क्यांची घट झाली. ‘सीपी’मध्ये करपूर्व नफा 93 कोटी रुपयांचा झाला. गेल्या वर्षीच्या 84 कोटींच्या तुलनेत यंदा ही सहामाहीतील वाढ 11.1 टक्क्यांची झाली. सीपी विभागाची ऑपरेटिंग मार्जिन्स 7.8 टक्के आहेत. इपीसी विभागात कंपनीने 639 कोटी रुपयांचे एकूण उत्पन्न मिळवले. गेल्या वर्षीच्या सहामाहीतील 915 कोटींच्या तुलनेत त्यात यंदा 30.2 टक्के घसरण झाली.

2020-21 या आर्थिक वर्षात पहिल्या सहामाहीमध्ये कंपनीने आपल्या कामकाजातून 467 कोटी रुपयांचा कॅशफ्लो मिळवला. गेल्या वर्षीच्या याच कालावधीत 294 कोटींचा कॅशफ्लो कंपनीला मिळाला होता. कंपनीवरील कर्जे 31 मार्च 2020 रोजी 962 कोटी रुपयांची होती, ती या सहामाहीत घटून 30 सप्टेंबर 2020 रोजी 559 कोटी रुपयांची झाली.

‘कोविड-19’च्या साथीमुळे जगभरात व भारतात उद्योग व्यवसाय विस्कळीत झाले आणि आर्थिक उलाढाली मंदावल्या. या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत कारखाने, तसेच विक्री, वितरण आणि इपीसी कंत्राटे यांचे कामकाज बंद राहिले. त्यामुळे कंपनीच्या कामगिरीवर त्याचा परिणाम झाला. आता कंपनीचे देशभरातील कारखाने, शाखा व गोदामांमध्ये कामकाज सुरू झाले आहे. कंपनीच्या ‘इपीसी साईट्स’देखील आता कार्यान्वित झाल्या आहेत. दुसऱ्या तिमाहीमध्ये कंपनीचा सर्व कारभार सुरळीत सुरू झाल्याने सीपी व इपीसी या विभागांमध्ये करपूर्व नफ्यामध्ये वाढ झाली आहे.

‘बजाज इलेक्ट्रिकल्स लि.’चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शेखर बजाज म्हणाले, ‘’दुसऱ्या तिमाहीमध्ये झालेल्या आमच्या दमदार कामगिरीमुळे मी खूष आहे. या तिमाहीत ग्राहकोपयोगी उत्पादनांच्या विभागात चांगली सुधारणा झाली आणि तिमाहीत होणारा करपूर्व नफा 85 कोटी या सर्वोच्च स्तरावर गेला. या तिमाहीत आमच्या इपीसी विभागाच्या कामगिरीतदेखील चांगली सुधारणा झाली. इतके दिवस या प्रकल्पांची कामे व त्यांची बिलिंग प्रक्रिया खोळंबली होती. आमच्या कामकाजातून मिळणाऱा ‘कॅशफ्लो’देखील आम्ही या तिमाहीमध्ये चांगला राखला व तो 322 कोटींवर गेला. त्यामुळे आमच्यावरील कर्जांचा बोजा काही प्रमाणात कमी झाला. या तिमाहीत आमची कामगिरी उत्कृष्ट झाली, यावरून आमच्या टीमने बाह्य आव्हानांना समर्थपणे तोंड दिल्याचे दिसून येते.’’

कंपनीकडे 1 ऑक्टोबर 2020 रोजीनुसार 1,474 कोटी रुपयांची कामे आहेत. यामध्ये वीज पारेषणाच्या टॉवर्सची कामे 482 कोटींची, वीज वितरणाची कामे 602 कोटींची आणि प्रकाशव्यवस्थेची कामे 390 कोटी रुपयांची आहेत.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

राज्यस्तरीय ७ वा जाधवर विज्ञान महोत्सव शनिवारी 

प्राचार्य डॉ. सुधाकरराव जाधवर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय...

निवडणुकीत पैशांच्या गैरवापरावर प्राप्तिकर विभागाची करडी नजर; २४ तास नियंत्रण कक्ष कार्यरत

पुणे : आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक प्रचारात होणाऱ्या...

ग्रंथ दालनातूनच साहित्य संमेलनस्थळी प्रवेश

पुणे : साहित्यिक, सांस्कृतिक विकासासाठी लेखक, प्रकाशक, विक्रेता आणि...

महाराष्ट्रात 600 मेगावॅट सौरऊर्जा प्रकल्पांसाठी विक्रन इंजिनीअरिंगचा ₹2,035 कोटींचा ईपीसी करार

महाराष्ट्रातील विविध ठिकाणी उभारण्यात येणारी 600 मेगावॅट एसी सौरऊर्जा...