‘बजाज अलियान्झ लाइफ इन्शुरन्स’तर्फे ‘वीर’ योजना सादर – देशातील शूरवीरांना त्यांच्या जीवनातील उद्दिष्टे पूर्ण करण्यात मदत करण्यासाठी एक नवीन उपक्रम

Date:

संरक्षण दले आणि केंद्रीय सशस्त्र पोलीस दलांसाठी विशेष व्यवसाय चॅनेल

पुणे : भारतातील आघाडीच्या खासगी आयुर्विमा कंपन्यांपैकी एक असलेल्या  ‘बजाज अलियान्झ लाइफ इन्शुरन्स’ने संरक्षण दले आणि केंद्रीय सशस्त्र पोलिस दलांसाठी (सीएपीएफ) वीर या नावाने एक समर्पित उपक्रम सादर केला आहे. या योजनेतून या कर्मचाऱ्यांना आपल्या कुटुंबियांना आर्थिकदृष्ट्या सुरक्षित ठेवता येईल. ‘वीर’ या नवीन बिझनेस चॅनेलचा भाग म्हणून, ‘बजाज अलियान्झ लाइफ इन्शुरन्स कंपनी’ देशाच्या या शूरवीरांसाठी आयुर्विम्याच्या नाविन्यपूर्ण योजना आणि काही अनन्य सेवा उपलब्ध करणार आहे. त्यामुळे जवानांना व पोलिसांना आपली दीर्घकालीन उद्दिष्टे पूर्ण करता येतील.

या उपक्रमावर भाष्य करताना, ‘बजाज अलियान्झ लाइफ इन्शुरन्सचे मुख्य बीएएलआयसी डायरेक्ट ऑफिसर श्री. अमित जैस्वाल म्हणाले, “संरक्षण दले ही देशाचा कणा असतात, कारण या दलांतील जवान प्रतिकूल परिस्थितीतही नागरिकांचे रक्षण करण्यासाठी आपला जीव धोक्यात घालतात. त्यांच्या निःस्वार्थ सेवेबद्दल त्यांचे केवळ आभार न मानता, त्यांच्यामध्ये आयुर्विम्याबद्दल जागरुकता निर्माण करून त्यांची जीवनातील उद्दिष्टे साध्य करण्यात त्यांना मदत करण्याचा आमचा प्रयत्न आहे. हे काम ‘वीर’च्या माध्यमातून आम्ही करणार आहोत. या जवानांच्या खास गरजांसाठी डिझाइन केलेल्या मूल्यात्मक आयुर्विमा योजना आम्ही त्यांना देऊच, त्याशिवाय काही विशेष सेवा आणि फायदेदेखील उपलब्ध करून देऊ. त्यातून त्यांना आपल्या कुटुंबासाठी आर्थिक सुरक्षा जाळे तयार करण्यात मदत होईल.”

संरक्षण दल आणि सीएपीएफ यांच्यासाठी कंपनी ‘वीर’च्या माध्यमातून बजाज अलियान्झ लाइफ अॅश्युअर्ड वेल्थ गोल – वेल्थ क्रिएशन ही योजना पुढे आणत आहे. ही एक नॉन-लिंक्ड, नॉन-पार्टिसिपेटिंग, वैयक्तिक स्वरुपाची, आयुर्विम्याची बचत योजना आहे. मुलांचे उच्च शिक्षण किंवा त्यांचे विवाह, सुटीमध्ये परदेशवारी, घरबांधणी अशी जीवनातील काही उद्दिष्टे पार पाडता येण्यासाठी ही योजना उत्पन्नाची हमी देते.

वीर चॅनेलची प्रमुख वैशिष्ट्ये:

·         मासिक आधारावर पॉलिसी प्रीमियम भरण्याची सोय

·         (काही निवडक प्रकारच्या उत्पादनांबाबत) पॉलिसी कालावधीच्या शेवटी एकरकमी रक्कम मिळण्याची हमी

·         युद्ध आणि युद्धासारख्या परिस्थितीसाठी विमासंरक्षण

·         अगदी कमीतकमी कागदपत्रे, पॉलिसी त्वरीत जारी होणे आणि कोणत्याही वैद्यकीय चाचण्यांची गरज नसणे यांसारख्या विशेष सेवा.

·         त्वरीत सहाय्य मिळण्यासाठी सेल्फ-सर्व्हिसिंग डिजिटल मालमत्तेची सुविधा

याव्यतिरिक्त, वीर उपक्रमाचा एक भाग म्हणून, ‘बजाज अलियान्झ लाइफ इन्शुरन्स’तर्फे सशस्त्र दलांतील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना आणि वीर नारींना (सैनिकांच्या विधवा पत्नी) कंपनीच्या कार्यालयांमध्ये करिअरच्या संधी प्रदान करण्यात येतील व त्यायोगे त्यांना सक्षम बनवण्यात येईल.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

राहुल गांधींना धमकी देणाऱ्या राज आमेरावर कारवाईची मागणी: काँग्रेसचे निषेध आंदोलन

पुणे: शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने बालगंधर्व चौकात निषेध...

आता २२ राज्यांमध्ये नागरिकत्व सिद्ध करावे लागणार,एसआयआर,बोगस मतदारांना वगळणार

पुणे (prab)- तब्बल २१ वर्षांनंतर नव्याने मतदार यादी तयार होणाऱ्...

पुण्यात एकाच वेळी मुळा, मुठा, खडकवासला धरणासह एकूण ४२ ठिकाणी जल स्वच्छता मोहीम

संवर्धनाच्या दिशेने संत निरंकारी मिशनचा सशक्त उपक्रम: ‘प्रोजेक्ट अमृत’चा...

भिवंडी महापौर निवडणुकीत बंडखोरी करणा-यांवर कारवाई:भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांची घोषणा

भिवंडी: भिवंडी निजामपूर महापालिकेच्या महापौरपदाच्या निवडणुकीत भाजपाच्या पक्षादेशा (व्हीप) विरोधात...