पुणे-माहिती अधिकार कायद्यात बदल करण्याच्या केंद्र सरकारच्या कृतीवर आक्षेप नोंदविण्यासाठी अमित बागुल मित्रपरिवाराने राळेगणसिद्धी येथे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची भेट घेऊन आरटीआय कायद्यात होणारा बदल रोखण्यासाठी जनआंदोलनात सक्रिय होण्याची ग्वाही दिली.
अमित बागुल आणि त्यांच्या मित्रपरिवाराने ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची भेट घेऊन निवेदन दिले.
केंद्र सरकारने माहिती अधिकारात केलेल्या बदल्यामुळे या कायद्याला धोका निर्माण झाला आहे . आपल्या पुढाकारातून जनतेला हा महत्वाचा अधिकार मिळाला ;पण हे सरकार ते हिरावून घेत आहे. एकप्रकारे हुकूमशाहीकडे या सरकारची वाटचाल असल्याचे केंद्र सरकारने माहिती अधिकारात केलेल्या बदल्यामुळे अधोरेखित झाले आहे. या कृत्याचा जाब देशवासीय नक्कीच विचारतील,आपण फक्त निर्देश द्यावेत. देशातील युवक आणि जनता रस्त्यावर उतरून या सरकारला जाब विचारल्याशिवाय राहणार नाही. असेही यावेळी भेट घेऊन सांगितले . याबाबत अमित बागुल म्हणाले कि, माहिती अधिकार कायद्यात बदल करणे ही अत्यंत चिंतेची बाब आहे. हा कायदा बराच विचार-विनिमय करून तयार करण्यात आला होता तसेच संसदेत तो एकमताने मंजूर झाला होता. मात्र, आता त्यात बदल होऊन तो संपण्याच्या मार्गावर आहे. यातील बदलांमुळे सरकारला विविध सरकारी संस्थांमध्ये माहिती आयुक्तांच्या नियुक्तया त्याच्या अटी, त्यांचा कार्यकाळ आणि वेतन-भत्ते यावर निर्णय घेण्याचा अधिकार मिळणार आहे. माहिती अधिकार २००५ नुसार, मुख्य माहिती आयुक्त आणि माहिती आयुक्तांचे वेतन, नियुक्त्यांची नियमावली तसेच भत्ते हे मुख्य निवडणूक आयुक्त आणि निवडणूक आयुक्तांच्या समान आहेत. त्यामुळे या कायद्यात बदल करून सरकार माहिती आयुक्तांना त्यांच्या अधिकारांपासून वंचित करण्याचा प्रयत्न करीत आहे. असा विविध सामाजिक स्थरातून सूर निघत असून त्यानुसार आम्ही ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची भेट घेऊन जनआंदोलन घेतल्यास त्यामध्ये सर्व युवक सहभागी होतील असेही अमित बागुल यांनी स्पष्ट केले. यावेळी त्यांच्या समवेत विश्वास दिघे , जयकुमार ठोंबरे , संतोष गेळे , महेश ढवळे , संतोष पवार , सागर आरोळे,धनंजय कांबळे, अभिजित गायकवाड, इम्तियाज तांबोळी अभिषेक बागुल,भाऊ दोडके,सतीश कांबळे आदी उपस्थित होते.
माहिती अधिकार कायद्याच्या रक्षणासाठी, अण्णा आम्ही तुमच्या समवेत ..
Date: