पुणे पुण्यातील जनता वसाहतजवळून जाणारा मुठा कालवा गुरूवारी दुपारी फुटला आणि संपूर्ण परिसर जलमय झाला. अनेकांचे संसार वाहून गेल्याने आता आम्ही करायचं काय असा उद्विग्न सवाल करणाऱ्या नागरिकांसाठी कार्यकर्ते धावून गेले. पिण्याच्या पाण्यासह चहा ,जेवणाची व्यवस्था शहर काँग्रेसचे अमित बागुल आणि मित्र परिवाराने केल्याने नागरिकांना दिलासा मिळाला.
जनता वसाहत येथे मुठा कालव्याला भगदाड पडल्याने सर्वत्र पूरसदृश स्थिती निर्माण झाली. वेगाने वाहणाऱ्या पाण्याच्या लोंढयात अनेकांचे संसार डोळ्यादेखत वाहून गेल्याने हतबल झालेल्या नागरिकांना आता करायचे काय ? या प्रश्नाने ग्रासले. पिण्यासाठी पाणी नाही कि खायलाही काही नाही अशा स्थितीत असलेल्या नागरिकांसाठी अमित बागुल आणि मित्र परिवार तसेच पुणे नवरात्रौ महोत्सवाचे पदाधिकारी सरसावले. माजी उपमहापौर आबा बागुल हेही घटनास्थळी होते. त्यांच्या सूचनेनुसार नागरिकांना पिण्याचे पाणी, चहा, जेवण उपलब्ध करून देण्यात आले. कालवा फुटला आणि सायंकाळी पाऊसाने झोडपले. भरपावसात कार्यकर्ते नागरिकांसाठी कार्यरत असल्याचे चित्र होते.

