मुंबई – राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा यंदाचा वाढदिवस मोठ्या धुमधडाक्यात साजरा होत आहे. शिवसेनेचे कार्यकर्ते उद्धव ठाकरेंच्या भेटी घेत आहेत. गावाखेड्यातील शिवसैनिक सोशल मीडियातून शुभेच्छा देत आहे. तर, राजकीय पक्षाचे नेतेही त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना दिसून येतात. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही उद्धव ठाकरेंना शिवसेनाप्रमुख हा शब्द जाणीवपूर्वक वगळून शुभेच्छा दिल्या आहेत. तर, माजी मंत्री आणि प्रहार संघटनेचे प्रमुख बच्चू कडू यांनीही शिवसेना पक्षप्रमुख म्हणत उद्धव ठाकरेंना शुभेच्छा दिल्या आहेत.उदय सामंतांनी तर कडी केली आहे रामदास कदम यांना शिवसेना नेते म्हटले आहे तर उद्धव ठाकरे यांना मात्र शुभेछ्या देताना शिवसेना हा शब्दच वगळून टाकला आहे. वाढदिवसाच्या शुभेछ्या देताना भाजपा नेते फडणवीस आणि बंडखोरांनी केलेले राजकारण लपून राहिलेले नाही
उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाला शिवसैनिकांसह सामान्य नागरिक आणि विविध क्षेत्रांतील मान्यवर ‘मातोश्री’ निवासस्थानी येतात. उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा देण्यासाठी ‘मातोश्री’बाहेर रांगा लागतात. यातच आता शिवसैनिकांकडून रात्री १ वाजता उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाचे जोरदार सेलिब्रेशन करण्यात आले. त्यानंतर, शुभेच्छांचा ओघ सुरूच आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही उद्धव ठाकरेंना शुभेच्छा दिल्या आहेत. मात्र, त्यांनी दिलेल्या शुभेच्छा संदेशमध्ये शिवसेना पक्षप्रमुख हा शब्द जाणीवपूर्वक टाळला असल्याचे दिसून येत आहे.
केवळ, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री असा शब्दप्रयोग केला आहे. त्यामुळे, पुन्हा एकदा शिवसेना विरुद्ध शिंदेगट यांच्यातील शिवसेना पक्षाच्या लढाईची चर्चा रंगली आहे. विशेष म्हणजे शिंदे गटाचे दुसरे नेते उदय सामंत यांनीही उद्धव ठाकरेंना ट्विटरवरुन दिलेल्या शुभेच्छांमध्ये शिवसेना या शब्दाचा कुठेही उल्लेख केलेला दिसत नाही. मात्र, माजी मंत्री बच्चू कडू यांनी शिवसेना पक्षप्रमुख असा उल्लेख करत उद्धव ठाकरेंना शुभेच्छा दिल्या आहेत.
दरम्यान, एकनाथ शिंदे आणि उदय सामंत यांनी उद्धव ठाकरेंना शुभेच्छा देताना शिवसेना पक्षप्रमुख हा उल्लेख टाळला. मात्र, बच्चू कडू यांनी शिवसेना पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री असे म्हणत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. त्यामुळे, शिंदे गटातील मतभिन्नता दिसून आली आहे.रामदास कदम यांना वाढदिवसाच्या शुभेछ्या देताना मात्र याच उदय सामंत यांनी कदम यांचा उल्लेख मात्र शिवसेना नेते असा केला आहे.