उद्धव ठाकरे राजकारणातील हरिश्चंद्र माणूस – बच्चू कडू

Date:

मुंबई-मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे राजकारणातील हरिश्चंद्र आहेत अशा शब्दांत आमदार आणि प्रहार क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष बच्चू कडू यांनी कौतुक केलं आहे. विधानसभेत झालेल्या बहुमत चाचणीदरम्यान महाविकास आघाडी सरकारने विश्वासदर्शक ठराव जिंकला आहे. उद्धव ठाकरे सरकारने अत्यंत सहजपणे बहुमत सिद्ध केलं आहे. १६९ आमदारांनी उद्धव ठाकरे सरकारला समर्थन दिलं. तर चार आमदारांनी यावेळी तटस्थ राहण्याची भूमिका घेतली. भाजपाने मात्र हे अधिवेशन बेकायदेशीर असल्याचा आरोप करत सभात्याग केला. यावेळी दादागिरी नही चलेगी अशी घोषणाबाजीदेखील करण्यात आली.

बहुमत सिद्ध झाल्यानंतर सर्व आमदारांनी आपलं मत व्यक्त केलं. यावेळी बच्चू कडू यांनी म्हटलं की, “उद्धव ठाकरे हे राजकारणातील हरिश्चंद्र आहेत असे मी मानतो. उद्धव ठाकरे शब्दाला जागणारे असून बाळासाहेबांकडून त्यांना राजकारणातील बाळकडू मिळालं आहे. मी त्यांचे अभिनंदन करतो”.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

महावितरणच्या स्मार्ट मीटर बसविण्याच्या कामगिरीचा ‘बिग इम्पॅक्ट’ पुरस्काराने गौरव

मुंबई: दि. २६ फेब्रुवारी २०२६ – सर्वाध‍िक अत्याधुन‍िक स्मार्ट मीटर बसवून देशात प्रथम...

अगोदर तपास करू नंतर निष्कर्ष निघेल तसा गुन्हा दाखल करू-सीआयडीचे अजित पवारांच्या अपघाती मृत्यूवर स्पष्टीकरण

तपासाला कालमर्यादा नाही पुणे-दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताचा...

‘माझा मराठाची बोलु कौतुकें’

वि. वा. शिरवाडकर (कुसुमाग्रज) यांचा २७ फेब्रुवारी हा जन्मदिन...