पुणे: भारत फोर्ज लि.चे सीएमडी बाबा कल्याणी यांना जपानच्या सरकारने ऑर्डर ऑफ रायजिंग सन, गोल्ड अँड सिल्व्हर स्टार या पुरस्काराने गौरवले आहे. जपान व भारत यांचे आर्थिक क्षेत्रातील नाते अधिक दृढ होण्यासाठी त्यांनी दिलेल्या योगदानासाठी या वर्षीच्या ऑटम डेकोरेशन्सचा स्वीकार करणारे ते परदेशी व्यक्तींपैकी एक आहेत.
कल्याणी हे नामवंत आंतरराष्ट्रीय उद्योजक आणि भारत फोर्जचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक आहेत आणि जपान – इंडिया बिझनेस लीडर्स फोरमचे ते सह-अध्यक्ष आहेत. चर्चेमध्ये पुढाकार घेऊन आणि आर्थिक समस्या सोडवण्यासाठी अहवा तयार करून ते फोरमसाठी सक्रिय योगदान देत आहेत. याबरोबरच, त्यांनी भारतात विस्तार करण्यासाठी जपानी कंपन्यांना उत्तेजन दिले आहे.
यानिमित्त बोलताना, बाबा कल्याणी यांनी सांगितले, “डेकोरेशन्स – ऑर्डर ऑफ रायजिंग सन पुरस्कार स्वीकारताना मला अतिशय आनंद होत आहे व अभिमान वाटतो आहे. या सन्मानाबद्दल मी जपानच्या सरकारचा आभारी आहे.”
ऑर्डर ऑफ रायजिंग सन गौरवाची सुरुवात एम्परर मैजी यांनी 1875 मध्ये केली. जपानच्या सरकारचा हा दुसऱ्या क्रमांकाचा सर्वोच्च राष्ट्रीय सन्मान आहे. आंतरराष्ट्रीय संबंध, जपानी संस्कृतीचा प्रसार, आपल्या क्षेत्रातील प्रगती व पर्यावरणाचे संवर्धन व कल्याण यांचा विकास यासाठी योगदान देणाऱ्यांना हा पुरस्कार दिला जातो.
भारत फोर्जविषयी
पुण्यातील भारत फोर्ज लिमिटेड (बीएफएल) ही मेटल फॉर्मिंगमधील तंत्रज्ञान-प्रणित, जगभरातील आघाडीची भारतीय बहुराष्ट्रीय कंपनी आहे. कंपनी विविध खंडांमध्ये कार्यरत असून, तिचे दहा ठिकाणी उत्पादन प्रकल्प आहेत आणि कंपनी ऑटोमोटिव्ह, ऊर्जा, ऑइल व गॅस, बांधकाम व खाणकाम, रेल, मरिन व एअरोस्पेस अशा विविध क्षेत्रांना सेवा देते. कल्याणी समूहाचा भाग असणारी, 10,000 जागतिक मनुष्यबळ व 3 अब्ज डॉलर उलाढाल असणारी बीएफएल आज या प्रदेशातील मेटॅलर्जिकल नॉलेजची सर्वात मोठी रिपॉझिटरी आहे आणि भौगोलिकदृष्ट्या विखुरलेल्या ग्राहकांना संकल्पनेपासून उत्पादन डिझाइन, इंजिनीअरिंग, उत्पादन, चाचणी व व्हॅलिडेशन यापर्यंत परिपूर्ण सेवा देते.