शोककळा
पुण्यातील महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या आबेदा इनामदार वरिष्ठ महाविद्यालयाच्या कॉम्पुटर सायन्स विभागाच्या विद्यार्थ्यांची सहल मुरूड (रायगड) समुद्र किनार्यावरगेली असता, त्यातील सुमारे 12 ते 13 विद्यार्थी बुडून मृत पावल्याचे वृत्त आहे. अजून सुमारे 5 विद्यार्थ्यांवर उपचार सुरू आहेत.
या घटनेची माहिती घेण्याचे काम सुरू आहे, असे उपप्राचार्य शैला बूटवाला यांनी सांगितले. तर घटनास्थळी संस्थेचे पदाधिकारी रवाना झाले असून, शासकिय रूग्णालयात काहींवर उपचार सुरू असून मदतकार्यासाठी स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांची मदत घेण्यात येत आहे. 10 अॅम्ब्युलन्स पुण्यातून पाठविण्यात आल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष पी.ए.इनामदार यांनी दिली.
एकूण 50 मुले, 66 मुली आणि इतर शिक्षक मिळून 127 जण सहलीला गेले होते. पाच विद्यार्थ्यांना वाचविण्यात आले असल्याचे सूत्रांनी सांगितले.समुद्राला भरती असल्याने वाळू सरकली आणि विद्यार्थ्यांचा तोल जाऊन ते पाण्यात बुडाले.
आझम कॅम्पस शैक्षणिक परिसरावर शोक कळा पसरली असून मंगळवारी २ फेब्रुवारी रोजी कामकाज बंद राहणार असल्याचे सचिव लतीफ मगदूम यांनी सांगितले
मृत विद्यार्थी
१)शीफा काझी २) सुप्रिया पाल ३) शाफिया अन्सारी ४) सुमेय्या अन्सारी, ५) इफ्तिकार शेख,६) सना मुनीर ७) साजिद चौधरी ८) राफिया अन्सारी ९) फरीन सय्यद,१०) युसुफ अन्सारी,११)पी. व्हि. राजलक्ष्मी ,१२) समरीन शेख १३) सलगर स्वप्नील .
अधिक माहितीसाठी उपप्राचार्य शैला बूटवाला यांच्याशी संपर्क साधावा. (9422025919)

