पुणे महापालिकेस ‘सस्टेनेबल मोबॅलिटी अवॉर्ड’ प्रदान

Date:

आयटीडीपी टीमने ब्राझील मधून आणलेला पुरस्कार माननीय महापौर यांनी स्वीकारला

  • गत वर्षातील पूर्ण प्रकल्पांची माहिती एकत्रित संकलन करून पुस्तिका तयार

पुणे (प्रतिनिधी) : ‘पुणे शहरातील शाश्वत गतिमान वाहतुक व्यवस्था कशी असावी यासंदर्भातील गेल्या पाच वर्षातील पूर्ण झालेल्या विविध प्रकल्पांची माहिती एकत्रित संकलित करुन ‘Sustainable Transport Journey’ ही पुस्तिका तयार करण्यात आली, या पुस्तिकेचे प्रकाशन महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते करण्यात आले. आपले सर्व उपक्रम लक्षात घेऊन अनेक महत्वाचे आंतरराष्ट्रीय पातळीवरील २०२० अवॉर्ड पुणे महानगरपालिकेस प्राप्त झाले आहेत,’अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली.

महापौर मोहोळ म्हणाले की,’ पुणे शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करणेच्या अनुषंगे सन २००८ मध्ये बहुसमावेशक शाश्वत प्लॅन (comprehensive mability plan) तयार केला त्यामध्ये बी.आर.टी, दोन मेट्रो मार्गिका या प्रमुख प्रकल्पांचा समावेश होता.’

‘सन २०१६ मध्ये पुणे मनपा मार्फत पादचारी धोरण (pedestrian policy) व अर्बन स्ट्रीट डिझाईन मार्गदर्शक तत्वे (Urban street design guidelines) तयार केल्या, त्यामध्ये वाहनांसाठी मार्गिका सोबत पादचारी मार्ग, सायकल मार्ग व अनुषंगिक सुविधांचा प्राधान्याने विचार केला. तसेच सायकल प्लॅन, पार्कीग पॉलिसी तयार करण्यात आल्या आहेत,’ अशी माहिती महापौर मोहोळ यांनी दिली.

महापौर मोहोळ म्हणाले की,’ सदर धोरणांचा विचार करून जंगली महाराज रस्त्याचे विकसन केले. त्यास केंद्र शासनाचे Best street Design अवॉर्ड प्राप्त आहे. तसेच सदर धोरणाचे आधारावर फर्ग्युसन रस्ता, राजभवन रस्ता, औंध डी.पी.रस्ता, बिबवेवाडी रस्ता इ.२५ कि. मी. लांबीचे रस्ते विकसीत केले आहेत. नवीन वर्षात शहरातील ६ रस्ते या थोरणावर आधारित विकसीत करण्यात येणार आहेत. सदर रस्त्याबरोबर अंतर्गत रस्ते व फुटपाथ यांचे पुननिर्माण करणेत येत आहे त्यामध्ये लक्ष्मी रस्ता, टिळक रस्ता, भांडारकर, प्रभात रस्ता इ. समाविष्ट आहेत.’

‘अर्बन ९५ प्रकल्प सदर संकल्पनेवर आधारित ‘मुलांची वाहतुक पाठशाळा’ हा प्रकल्प बेमन चौक, औंध या ठिकाणी विकसीत केला आहे. त्यामध्ये वय वर्ष १२ पर्यंतच्या मुलांना वाहतुक विषयक नियमांचे ट्रेनिंग दिले जाणार आहे,’असे महापौर मोहोळ म्हणाले.

‘ पी.एम.पी.एम.एल मार्फत सी.एन.जी./विद्युत बसेस पुरविणे व बी. आर.टी. या प्रकल्पा अंतर्गत सार्वजनिक वाहतुका व्यवस्था सक्षम करणेत येत आहे. स्मार्ट सिटी अंतर्गत औंध, बाणेर, बालेवाडी परिसरामध्ये विविध प्रकल्पाअंतर्गत नागरिकांना रस्ते व इतर सुविधा अनुषंगिक प्रकल्प सुरू आहेत,’अशी माहिती महापौर मोहोळ यांनी दिली.

‘सर्व उपक्रम लक्षात घेऊन ब्राझिल येथील कार्यक्रमामध्ये’ आयटीडीपी’ ला आंतरराष्ट्रीय पातळीवरील ‘Sustainable mobility aword’ प्राप्त झाला होता. आज तो पुरस्कार माननीय महापौर मुरलीधर मोहोळ यांनी स्विकारला.’

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

ड्रंक &ड्राईव्ह , 3 दिवसात पोलिसांनी पकडले 201 चालक

पुणे दिनांक: 22 डिसेंबर 2025 पुणे शहर वाहतूक विभागाकडून मद्यपान...

बिबट्याला रोखण्यासाठी…..!!

पुणे जिल्ह्यातील उत्तरेकडील जुन्नर, आंबेगाव, खेड, शिरुर व दौंड...

जिल्ह्यातील उर्दू शाळांमध्ये अल्पसंख्याक हक्क दिन साजरा

पुणे दि. २२ : जिल्ह्यात पुणे, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका तसेच...

डॉ. कैलास कदम यांचा काँग्रेस शहराध्यक्ष पदाचा राजीनामा

पिंपरी, पुणे (दि. २२ डिसेंबर २०२५)- पिंपरी चिंचवड शहर...