मुंबई, 31 डिसेंबर 2021: महाराष्ट्राचे अंतरराष्ट्रीय खेळाडू ऋतुजा भोसले, अर्जुन कढे, मिनी ज्युनियर नॅशनल चॅम्पियन्स विजेता अर्णव पापरकर, 16 वर्षाखालील राष्ट्रीय क्रमांक एक असलेली वैष्णवी आडकर आणि इतर 31 खेळाडू, प्रशिक्षक, ऑफिशियल यांना त्यांच्या 2020 या वर्षातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल एमएसएलटीए वार्षिक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
आकांक्षा नित्तुरे, वेदांत भसीन, नैनिका रेड्डी, समर्थ सहिता, मानस धामणे यांनी 2020 सालासाठी आपापल्या वयोगटात महाराष्ट्राच्या टेनिसपटूंच्या क्रमवारीत प्रथम क्रमांक पटकावला.
10 लाखांहून अधिक रकमेचे हे पुरस्कार जर्मनीचे महावाणिज्य दूत डॉ. जुर्गेन मॉर्हार्ड, महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे सरचिटणीस नामदेव शिरगावकर, ध्यानचंद पुरस्कार विजेते प्रदीप गंधे, एमएसएलटीएचे आजीवन अध्यक्ष शरद कन्नमवार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. यावेळी आजीवन उपाध्यक्ष बालचंद्र भागवत, एमएसएलटीएचे अध्यक्ष भरत ओझा, एमएसएलटीएचे मानद सचिव सुंदर अय्यर, एमएसएलटीएचे संयुक्त सचिव राजीव देशपांडे आणि राजीव देसाई आदी मान्यवर उपस्थित होते.
एमएसएलटीएचे आजीव अध्यक्ष शरद कन्नमवार आणि एमएसएलटीएचे अध्यक्ष भरत ओझा यांना त्यांच्या एमएसएलटीएमधील सेवेबद्दल आजीव पुरस्कार प्रदान करण्यात आला. एमएसएलटीए मौदानावरील कोर्ट क्रमांक एक शरद कन्नमवार यांच्या नावाने समर्पित करण्यात आले तर एमएसएलटीए येथील प्लेअर्स लाउंज भरत ओझा यांना समर्पित करण्यात आले.
टेनिसच्या संवर्धन व प्रसारासाठी आजीव कामगिरी आणि योगदान दिल्याबद्दल भारत सरकारकडून 2020 मध्ये ध्यानचंद पुरस्काराने सम्मानीत नंदन बाळ यांना विशेष पुरस्काराने गौरविण्यात आले. आयटीएफ गोल्ड बॅजरेफ्री नितीन कन्नमवार यांची टोकियो, जपान येथे पार पडलेल्या पॅरालिम्पिक गेम्समध्ये टेनिस स्पर्धेसाठी पंच म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल तर चेअर अंपायर म्हणून अवनी गोसावी तसेच आयटीएफ कडून टेनिस ऑफिशिएटिंगसाठी राष्ट्रीय महिला राजदूत म्हणून सुप्रिया चॅटर्जी यांची नियुक्ती झाल्याबद्दल त्यांना विशेष पुरस्काराने गौरविण्यात आले.
राष्ट्रीय खेळाडू तयार केल्याबद्दल प्रशिक्षक हेमंत बेंद्रे, प्रोसोनजीत पॉल, इथिराज नायडू आणि इम्रान शेख यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला.
आमच्या वरिष्ठ प्रशासकांच्या योगदानाची दखल घेणे व राज्य आणि राष्ट्राला नावलौकिक मिळवून देणार्या आमच्या खेळाडूंचा सत्कार करणे हे अतिशय आनंददायी असल्याचे एमएसएलटीएचे मानद सचिव सुंदर अय्यर म्हणाले.
पारितोषिक विजेते खेळाडूंची यादी–
अर्णव पापरकर(पुणे), वेदांत भसीन(मुंबई), अर्जून कढे(पुणे), ऋतुजा भोसले(पुणे), आर्यन गोवीस(मुंबई), महक जैन(नवी मुंबई), आकांक्षा नित्तुरे(नवी मुंबई), नैनिका रेड्डी(सोलापुर), वैष्णवी आडकर(पुणे), मानस धामने(पुणे), समर्थ साहिता(मुंबई), आकृती सोनकुसरे(सोलापुर), आर्यन भाटीया(मुंबई), आदित्य बलसेकर(मुंबई), संदेश कुरळे(कोल्हापुर), अनर्घ गांगुली(पुणे), साहिल तांबट(पुणे), जैष्णव शिंदे(पुणे), काहिर वारीक(मुंबई), स्वरमन्यु सिंग(मुंबई), दक्ष पाटील(पुणे), दर्श खेडेकर(मुंबई), नमिश हुड(पुणे), प्रेरणा विचारे(मुंबई), सई भोयार(नागपुर), रुमा गायकैवारी(पुणे), ईरा शाह(पुणे), कायरा चेतनानी(मुंबई), हृती आहुजा(पुणे), ऐश्वर्या जाधव(कोल्हापुर), रितिका दवलकर(पुणे), स्वानिका रॉय(पुणे).