पुणे: श्री सत्य साई लोक सेव ट्रस्ट द्वारे “श्री सत्य साई मानव श्रेष्ठता पुरस्कारा” चा कार्यक्रम सत्य साई ग्राम, मुड्डेनहल्ली , कर्नाटक येथे २३ नोव्हेंबर २०१७ रोजी आयोजित केला गेला. सिस्टर लूसी कुरियन, पुणे यांना “श्री सत्य साई मानव श्रेष्ठता पुरस्कार प्रदान करण्यात आला असून, त्यांना हा पुरस्कार “धर्मांच्या एकजुटी” या श्रेणीकरता देण्यात आला आहे. हा पुरस्कार यांच्या हस्ते देण्यात आला असून यापुर्वी विविध क्षेत्रातील ८ महिलांना हा पुरस्कार बहाल करण्यात आलेला आहे.
सिस्टर लूसी कुरियन यांनी ९१९७ साली “माहेर” ची निर्मीती केली, ज्याचा अर्थ आहे माझ्या आईचे घर असा होतो. ही संस्था पुणे, महाराष्ट्र येथे कार्यरत असून कोणत्याही जाती, धर्म किंवा सांप्रदायाच्या निराश्रित, महिलांकरता कार्य करते. या केंद्रा द्वारे काही सेवा देखील प्रदान केल्या जातात ज्या जागरूकता अभियानापासून कुबड्यांचे वाटप, बालवाडी (शिशु मंदिर), शिकवण्या, कार्यशाळा, आणि स्वयं-चलित समूह राबविले जातात ज्यामुळे येथील महिलांना एक स्वतंत्र आणि मानाचे आयुष्य जगता येऊ शकेल. गेल्या पंधरावर्षात, माहेर द्वारे १५,००० पेक्षा अधिक महिला आणि मुलांना एक सामान्य आयुष्य जगण्याकरता मदत केली गेलेली असून सध्य स्थितीमध्ये ८६० पेक्षा अधिक रस्त्यावरील मुले आणि ३२० निराश्रित महिलांना छप्पर उपलब्ध करून देण्यात आलेले आहे.
टॅफ़ेच्या अध्यक्षा आणि सीईओ, असलेल्या कु. मल्लिका श्रीनिवासन, या परितोषिकाच्या आयोजन समितीच्या बाजूने बोलताना म्हणाल्या,” या आदर्श महिला जगाकरता आणि येथील महिलांकरता एक शक्तीशाली असा आशेचा किरण आहेत. प्रेरणास्थान, अनुकरणास पात्र, हिमतीचे उदाहरण, निशष्ठा आणि त्यागाचे प्रतिक असून त्यांनी आपापल्या क्षेत्रात श्रेष्ठता तर सिद्ध केलीच आहे पण त्याही पलिकडे जाऊन; लाखो लोकांना आपल्या अथक आणि ध्येय निष्ठ प्रयत्नांनी समाजाचे रूपांतरण, जगाला समृद्ध करून आशेचा, आनंदाचा एक किरण दर्शविलेला आहे. यांच्यातील प्रत्येकाचा मार्ग हा एक आगळा वेगळा आणि कल्पक असा आहे, ज्यामधून आपल्या सगळ्यांना कालात्मकता, दया, प्रेम आणि कष्टाने सगळ्यांकरता एका चांगल्या जगाची निर्मीती होऊ शकते हेच शिकायला मिळते.”
पारितोषिके मिळणाऱ्या व्यक्ती यांनी सामाजिक संदर्भ असलेल्या क्षेत्राकरता आपले आयुष्य वेचले असून आपले संपूर्ण कार्य हे जीवन बदलून टाकण्याच्या आपल्या ध्येयाकरता समर्पित केले आहे. श्री सत्य साई जीवन श्रेष्ठता पुरस्कार हा सात क्षेत्रातील विविध प्रसिद्ध व्यक्तींना देण्यात येतो: शिक्षण, पर्यावरण, आरोग्य, संगीत आणि कला, धर्मांची एकजुट, महिला व बाल कल्याण आणि खेळ. हे पारितोषिक प्रदान करण्याकरता नावाजलेल्या पंच समितीची नेमणूक केली जाते ज्यात उपस्थित असलेले सदस्य काळजीपुर्व पारितोषिकाच्या वर्गीकरणाचे मूल्यांकन करतात आणि नामांकित व्यक्तींची पारख करतात.
अशा प्रकारचे अलौकिक काम केल्याबद्दल सन्मानित केलेल्या इतर व्यक्तींची नावे:
§ डॉ. सकीना यकुबी, अफ़गाणिस्तान, शिक्षण क्षेत्र
§ कु. लोर्ना रुट्टो , केनिया, पर्यावरण
§ डॉ. एम. शारदा मेनन, भारत, आरोग्य
§ प्रा. प्रेमा पांडुरंग, भारत, संगीत आणि कला
§ कु. लेयम्हा रॉबर्टा ग्बोवी, लिबेरिया, धर्मांची एकजुट
§ कु. कौसल्या पेरियासामी, भारत, महिला आणि बाल कल्याण
§ कु. अनुराधा कोईराला, नेपाळ, महिला व बाल कल्याण
§ कु. मीनाक्षी राघवन, भारत, खेळ