राष्ट्रीय कला अकादमी आणि नू.म.वि. प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय यांच्यावतीने गालिचा रांगोळी प्रदर्शन : २९ फेब्रुवारी पर्यंत प्रदर्शन
पुणे: किंकरी, उरुमी, ढोडरो बानाम, पाहु या आदिवासी संगीत वाद्य बारकाईने साकारलेली मनमोहक रांगोळी… मराठी मातीचा अभिमान असणारी मराठी भाषेच्या शुभेच्छा देणारी आणि अतिशय सुंदर पद्धतीने साकारलेली हिन्दू देवी देवतांची रांगोळी यासोबतच. स्वातंत्र्यवीर सावरकर… शहिदांना अभिवादन… विविध रंग आणि पैठणीचा सुंदर साज उलगडणारी रांगोळी… अशा विविध संकल्पनेतून निर्माण झालेल्या गालिचा रांगोळी पाहण्याची संधी अवघा रंग एक झाला या गालिचा रंगावली प्रदर्शनातून पुणेकरांना मिळाली.

राष्ट्रीय कला अकादमी (न्यास) आणि नू.म.वि. प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने अप्पा बळवंत चौकातील नू.म.वि. प्रशालेत ‘अवघा रंग एक झाला’ या गालिचा रंगावली प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रदर्शनाचे उद्घाटन चित्रकार विशाल वाडे यांच्या हस्ते झाले. यावेळी राष्ट्रीय कला अकादमीच्या संचालिका रोमा लांडे, अमर लांडे, अतुल सोनावणे, सुनील सोनटक्के उपस्थित होते. गणेश माने, किरण फाळके, सुप्रिया मुरमुरे, अरुणा गाडे, गौरव निविलकर, कुणाल चौधरी यांनी संयोजन केले.
स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर, बाप्पी लाहिरी यांनी रंगावलीतून श्रद्धांजली, विज्ञान दिन, महाशिवरात्री, स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव अशा विविध विषयांवर रंगबेरंगी रांगोळ्या प्रदर्शनात साकारण्यात आल्या आहेत.
प्रदर्शनात २० पेक्षा अधिक रंगावल्या साकारण्यात आल्या आहेत. दि. २८ फेब्रुवारी पर्यंत सकाळी ९ ते रात्री ९ यावेळेत हे प्रदर्शन विनामूल्य पाहता येणार आहे.

