SHARAD LONKAR

55081 POSTS
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Exclusive articles:

आंबेडकर जयंतीनिमित्त बावधनमध्ये चार दिवसीय ‘भीम फेस्टिवल’

पुणे : विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समिती, अखिल बावधन विकास प्रतिष्ठान व सुजाता महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ....

झटपट सर्वात कमी किमतीच्या कॅब आणि ऑटोची रॅपिडो देतो हमी

नवी दिल्ली, 15 एप्रिल, 2024 : रॅपिडो ही देशभरातील 100 हून अधिक शहरांमध्ये कार्यरत असलेली आघाडीची राइड-हेलिंग कंपनी असून, कंपनी या आयपीएल हंगामात दोन प्रभावी मोहिमा राबवत आहे: 'लोवेस्ट प्राईस गॅरंटीड' आणि '5 नही तो 50' अनुक्रमे त्यांच्या कॅब आणि ऑटो सेवा आहेत. द अदर हाफ, बुटीक क्रिएटिव्ह आणि प्रोडक्शन एजन्सीद्वारे तयार केलेल्या या मोहिमा आहेत. जेव्हा प्रवासी लगेच प्रवास सुरू करू शकत नाही तेव्हा मनात येणाऱ्या भावना, निर्माण होणारे दडपण आणि येणारा ताण याची मांडणी यात करण्यात आली आहे. कमी दरात आणि तत्काळ वाहतूक सेवा उपलब्ध व्हावी यासाठीची तगमग यातून साकारण्यात आलेली आहे. रॅपिडो कॅब मोहीम रॅपिडोच्या ऑफरना शहरातील सर्वात लोकप्रिय बातमी म्हणून आनंददायक पद्धतीने सादर करते. प्रवाशांना ‘सर्वात कमी किमतीची हमी’ देणारी मोहीम, सर्वात कमी किमतीची खात्री अन्यथा तुमच्या वॉलेटमधील दुप्पट पैसे अशी ही मोहीम आहे. या मालिकेतील प्रत्येक चित्रपटात टॅक्सी तातडीने आवश्यक असते अशा घटनात्मक परिस्थितीचे चित्रण केले जाते. तथापि, रॅपिडोच्या सर्वात कमी किमतीच्या हमी ऑफरद्वारे या इव्हेंटमधून विनोद तयार होतो.  रॅपिडोच्या ऑटो मोहिमेमध्ये, "5 नही तो 50", ब्रँडने पारंपरिक जाहिरातींमध्ये उत्पादनांची शिफारस करणाऱ्या डॉक्टरांना विनोदाची फिरकी दिली. या मोहिमेमध्ये महिला प्रवाशांना ऑटो-रिक्षा सहज सापडत नसल्यामुळे होणारी निराशा अधोरेखित केली आहे. या हलक्याफुलक्या चित्रपटांमध्ये, नियमित ऑटो-हेलिंग ॲप्सला मागे टाकत, डॉक्टर अचानक रॅपिडोला अंतिम उपाय म्हणून लिहून देतात. रॅपिडो हमी देतो की ऑटो 5 मिनिटांत येईल किंवा ग्राहकाला त्यांच्या वॉलेटमध्ये 50 रुपये मिळतील. यातून हे सुनिश्चित होते की रॅपिडो त्याच्या ग्राहकांसाठी जलद आणि विश्वासार्ह वाहतूक प्रदान करते. या मोहिमांमध्ये दाखवलेले प्रसंग, दाखवलेले अनुभव हे प्रेक्षकांच्या मनात घर करतात. 'गॅरंटी पे गॅरंटी, सर्वात कमी किमतीची गॅरंटी' आणि '5 नहीं तो 50' यांसारख्या मजेदार आणि आकर्षक जिंगल्सचा समावेश, दिलेल्या संदेशांचा विनोद आणि संस्मरणीयता आणखी वाढवते. रॅपिडोचे सह-संस्थापक पवन गुंटुपल्ली यांनी सांगितले की, "आमच्या मोहिमा मूलभूत श्रेणीतील सत्यांभोवती तयार केल्या आहेत, आमच्या ऑफरचे अद्वितीय पैलू त्यातून दिसून येतात.मोहीम आम्हाला ब्रँड प्राधान्य वाढवण्यास सक्षम करेल. आमच्या वापरकर्त्यांसह मनमोहक कथा (श्रेणी सत्ये) तयार करून, आम्ही रॅपिडोला सोयीचे, परवडणारे आणि विश्वासार्ह वाहतूक उपायांमध्ये निर्विवाद लीडर म्हणून स्थापित करण्यास तयार आहोत.

अरमानाई 4 गाणे आचाचो प्रोमो आऊट! 

 तमन्ना भाटिया आणि राशि खन्ना 'अरनमानाई 4' मधल्या अच्छाचो या गाण्यात सोबत दिसणार. पॅन इंडियाची स्टार तमन्ना भाटिया आणि अष्टपैलू पॉवरहाऊस अभिनेत्री राशि खन्ना...

ज्येष्ठ नागरिकांच्या हातून अमोल कोल्हेंनी का हिसकावला माईक ?

पुणे- काल भोसरीत रात्री प्रचाराच्या एका स्तरावर एक ज्येष्ठ नागरिक अमोल कोल्हे यांचा प्रचारार्थ भाषण करत असताना त्यांच्या शेजारी उभे राहून ऐकत असलेल्या कोल्हे...

टाटा पॉवरच्या इव्ही चार्जिंग नेटवर्कने १० कोटी हरित किलोमीटरचा टप्पा पार केला

 पुणे-15 एप्रिल, २०२४:  भारतातील सर्वात मोठ्या एकात्मिक वीज कंपन्या आणि इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग सोल्युशन्स पुरवणाऱ्यांपैकी एक, टाटा पॉवरने सार्वजनिक, अर्ध-सार्वजनिक, बस/फ्लीट आणि संपूर्ण भारतातील होम चार्जर विभागात १० कोटी (१०० मिलियन) हरित किलोमीटरपर्यंत वीज पोहोचवणारी पहिली इव्ही चार्जिंग सोल्युशन्स पुरवठादार बनण्याचा मान मिळवला आहे. हे यश देशभरात शाश्वत मोबिलिटी सुविधांना प्रोत्साहन देण्यात टाटा पॉवर निभावत असलेली महत्त्वपूर्ण भूमिका अधोरेखित करते. वर्ष २०३० पर्यंत देशात होत असलेल्या वाहनांच्या एकूण विक्रीपैकी ३०% विक्री इलेक्ट्रिक वाहनांची असावी हे उद्दिष्ट घेऊन भारताने पर्यावरणपूरक वाहतुकीला प्रोत्साहन देण्याचे व्हिजन आखले आहे. FAME आणि नॅशनल इलेक्ट्रिक मोबिलिटी मिशन यासारख्या योजनांच्या माध्यमातून इ-मोबिलिटीला चालना दिली जात आहे. इव्ही चार्जिंग सुविधांची भूमिका अतिशय महत्त्वाची असल्याचे लक्षात घेऊन या परिवर्तनासाठी पायाभूत आवश्यकता म्हणून टाटा पॉवरने इझी चार्ज या नावाने आपल्या नेटवर्कमध्ये ८६००० पेक्षा जास्त होम चार्जर, ५३०० पेक्षा जास्त सार्वजनिक, निम-सरकारी आणि फ्लीट चार्जिंग पॉईंट्ससह ५३० शहरांमध्ये ८५० पेक्षा जास्त बस चार्जिंग स्टेशन्सचा समावेश केला आहे. वाहनचालकांच्या सुविधेसाठी हे चार्जर हायवे, हॉटेल्स, मॉल, हॉस्पिटल्स, कार्यालये, गृहसंकुले इत्यादी वेगवेगळ्या आणि भरपूर वाहतूक असलेल्या ठिकाणी बसवण्यात आले आहेत. टाटा पॉवरचे हे प्रयत्न भारतात इलेक्ट्रिक मोबिलिटीच्या वेगवान वाढीला पूरक ठरत आहेत. उद्योगक्षेत्रातील एका अनुमानानुसार, वर्ष २०३० पर्यंत भारतामध्ये इलेक्ट्रिक वाहनांची वार्षिक विक्री १ कोटींपर्यंत पोहोचेल अशी अपेक्षा आहे. टाटा पॉवर, देशभर पसरलेल्या आपल्या नेटवर्कसह या परिवर्तनामध्ये सर्वात आघाडीवर आहे. इलेक्ट्रिक वाहने आणि इव्ही चार्जिंगच्या पायाभूत सेवांच्या मागणीतील वाढीबरोबरीनेच टाटा पॉवर आरएफआयडी कार्डसारख्या अनेक तंत्रज्ञान-सक्षम ग्राहककेंद्री सुविधा आणत आहे. या कार्डमार्फत वायरलेस पेमेंट करून इव्ही मालक खूपच सहजपणे tap.charge.go करू शकतात. शून्य उत्सर्जन मोबिलिटीप्रती अतूट निष्ठेचे पालन करण्यासाठी टाटा पॉवरला 'शून्य इन्फ्रास्ट्रक्चर चॅम्पियन' हा प्रतिष्ठित सन्मान देऊन गौरवण्यात आले आहे. नुकताच नवी दिल्लीत दुसऱ्या वार्षिक शून्य फोरममध्ये हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. नीती आयोगाने २०२१ साली सुरु केलेल्या शून्य - झिरो पोल्युशन मोबिलिटी कॅम्पेनने अनेक महत्त्वपूर्ण भागीदारींना प्रोत्साहन दिले आहे. यामध्ये भारत सरकारचा नागरिकांना सहभागी करून घेणारा, जोडून ठेवणारा मंच MyGov आणि जवळपास २०० उद्योग भागीदार आहेत. या भागीदारींमध्ये सहभागी होऊन इ-कॉमर्स आणि खाद्य वितरण कंपन्या, राईड-हेलिंग सेवा, वाहन उत्पादक, फ्लीट एग्रीगेटर्स, पायाभूत सेवासुविधा प्रदान करणे आणि फायनान्सर इलेक्ट्रिक वाहन इकोसिस्टिममध्ये शुद्ध मोबिलिटी इकोसिस्टिमला आकार देण्यात सहायक भूमिका बजावत आहेत.

Breaking

“आयुष्यावर बोलू काही” आणि बावधन-कोथरूड भूषण पुरस्कार सोहळा गुरुवारी

पुणे: राष्ट्रसेवा प्रतिष्ठानच्या वतीने सलील कुलकर्णी, शुभंकर कुलकर्णी आणि...

‘मनसे’शी युती म्हणजे उबाठा गटाचा अस्तित्व वाचवण्याचा शेवटचा प्रयत्न

भाजपा माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन यांची प्रखर टीकामुंबई-उबाठा...

‘आचार संहिता, नैतिक संकेतांची युती सरकार कडून पायमल्ली- काँग्रेस’चा आरोप

‘निवडणूक आयोगा’ने सत्ताधाऱ्यांना कारवाई च्या नोटिसा पाठवून आपली स्वायत्तता...

सातारा जिल्ह्यातील एमडी ड्रग्ज कारखाना प्रकरणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे लागेबांधे असल्याने प्रकरण दडपण्याचा प्रयत्न: हर्षवर्धन सपकाळ

सातारा ड्रग्ज प्रकरणावरून लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठीच महानगरपालिकेच्या निवडणूका घाईगडबडीत...
spot_imgspot_img