SHARAD LONKAR

55110 POSTS
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Exclusive articles:

मतदान केंद्र उपलब्ध होण्यासाठी गृहनिर्माण संस्थांनी पुढाकार घ्यावा-जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

पुणे, दि. ४: विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत भारत निवडणूक आयोगाने शहरातील समूह इमारतींमध्ये तसेच निवासी गृहरचना संस्थांमध्ये मतदान केंद्रे स्थापन करण्यावर भर दिला असून...

जल जीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजनांची कामे गतीने पूर्ण करा-जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे

पुणे, दि. ४: ग्रामीण भागात पाणी टंचाईवर मात करण्यासाठी आणि तेथील जीवनमान उंचावण्यासाठी जल जीवन मिशन राबविण्यात येत असून या मोहिमेअंतर्गत अपूर्ण कामे महाराष्ट्र...

पर्वतीतून दोन आबा विधानसभेसाठी सुसज्ज

पुणे-एकीकडे विधानसभेचे अधिवेशन सुरु असताना दुसरीकडे पुण्यातील पार्वती विधानसभा मतदार संघातून आगामी विधानसभेच्या निवडणुकीसाठी जय्यत तयारीला प्रारंभ झाला आहे. आपण लढणारच..असा पवित्रा घेऊन कॉंग्रेसच्या...

‘ससून’ रुग्णालयाच्या कारभारावरून सभागृहात वादंग:विरोधी पक्षांच्या आमदारांनी काढले वाभाडे; आमदार धंगेकर, वडेट्टीवार, कदम आक्रमक

मुंबई -ससून रुग्णालयातील गैरप्रकारावरुन आज विधिमंडळात विरोधी पक्षांच्या आमदारांनी या रुग्णालयात होणऱ्या कारभाराचे वाभाडे काढले. यामध्ये आमदार रवींद्र धंगेकर, विजय वडेट्टीवार,...

एसबीआयतर्फे ‘एमएसएमई सहज’ – संपूर्ण डिजिटल इनव्हॉइस फायनान्सिंग सुविधेचे अनावरण

एमएसएमई कर्जाचा टीएटी केवळ १५ मिनिटांत मुंबई – स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय) या देशातील सर्वात मोठ्या बँकेने ‘एमएसएमई सहज’ ही वेब- आधारित डिजिटल व्यवसाय कर्ज सुविधा एमएसएमईच्या इनव्हॉइस फायनान्सिंगसाठी खास उपलब्ध केली आहे. ही सुविधा डेटा- ड्रिव्हन इनव्हॉस फायनान्सिंग क्रेडिट असेसमेंट इंजिन म्हणून विकसित करण्यात आली असून ती कर्जासाठी अर्ज करण्यापासून, कर्जासाठी आवश्यक कागदपत्रे आणि मंजूर झालेल्या कर्जाचे १५ मिनिटांत वितरण करण्यापर्यंत सर्व सेवा कोणत्याही मानवी हस्तक्षेपासह देते. ड्यु डेट रोजी कर्ज बंद करण्याची प्रक्रियाही स्वयंचलित असून ती सीस्टिमद्वारे पूर्ण केली जाते. ‘एमएसएमई सहज’ वापरून बँकेच्या ग्राहकांना त्यांच्या जीएसटी नोंदणीकृत १ लाख रुपयांपर्यंतच्या विक्री इनव्हॉइसवर १५ मिनिटांपेक्षा कमी वेळेत अर्थसाहाय्य मिळविता येते. हे उत्पादन मशिन लर्निंग मॉडेलवर आधारित असून जीएसटीआयएनवरील अधिकृत डेटा, ग्राहकाचे बँक स्टेटमेंट्स आणि सीआयसी डेटा बेस इत्यादी वापरते. जीएसटी यंत्रणेचा भाग असलेल्या लघू एसएमई युनिट्सच्या खेळत्या भांडवलाच्या लघुकालीन गरजा पूर्ण करण्यासाठी ‘ऑन टॅप’ कर्ज मिळवून देणे हा या उत्पादनाचा हेतू आहे. हे उत्पादन योनोवरील डिजिटल मोडद्वारे एसबीआयच्या सध्याच्या ग्राहकांना उपलब्ध करून दिले जाईल आणि एमएसएमईजना तातडीने रोख रक्कम पुरवत त्यांची रोखीची समस्या सोडवेल. एमएसएमई सहज लाँच करत एसबीआयने परत एकदा एमएसएमई कर्ज क्षेत्रात नवा मापदंड प्रस्थापित केला आहे. एमएसएमई क्षेत्रावर पुढील पाच वर्षे बँकेतर्फे जास्त भर दिला जाणार असून हे नावीन्यपूर्ण डिजिटल उत्पादन डिजिटल कर्ज क्षेत्रात बँकेने टाकलेले लक्षणीय पाऊल आहे. हे उत्पादन स्टेट बँक ऑफ इंडियाच्या सोल प्रोप्रायटरशिप नॉन- क्रेडिट आणि बँकेसह समाधानकारक करंट खाते असणाऱ्या ग्राहकांसाठी खास तयार करण्यात आले आहे. हे नावीन्यपूर्ण उत्पादन बँकेच्या इंटरनेट बँकिंग अँपपद्वारे सहजपणे उपलब्ध असेल. एसबीआयचे अध्यक्ष श्री. दिनेश खारा म्हणाले, ‘एसएमई व्यावसायिक कर्जांसाठी डिजिटल सुविधा उपलब्ध करत या क्षेत्रात नवा मापदंड तयार करण्यासाठी एसबीआय बांधील आहे. त्यासाठी एमएसएमई कर्ज क्षेत्रात सातत्याने नावीन्यपूर्ण उत्पादने उपलब्ध करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असतो. हेच प्रयत्न आणखी बळकट करण्यासाठी एमएसएमई सहज तयार करण्यात आले असून, त्याद्वारे एमएसएमईजना डिजिटल साधनांच्या मदतीने जास्त जलद आणि सहजपणे वित्त सुविधा उपलब्ध करून देण्याचे ध्येय आहे. विशेषतः ही संपूर्ण प्रक्रिया स्वयंचलित पद्धतीसह तयार करण्यात आली आहे. एमएसएमई सहज हे एमएसएमई कर्ज क्षेत्रात नावीन्य आणि ग्राहकाभिमुखता आणण्याच्या आणि व्यवसाय करण्यातील सुलभपणा वाढविण्याच्या आमच्या प्रयत्नांचे फलित आहे. एमएसएमई सहजद्वारे वेगवान आणि इंट्युटिव्ह कर्ज सुविधा पुरवून देशात आघाडीची एमएसएमई कर्जपुरवठादार म्हणून आमचे स्थान आणखी बळकट करण्याचे ध्येय आहे.’ या भावनेला दुजोरा देत एसबीआय रिटेल बँकिंग आणि ऑपरेशन्सचे व्यवस्थापकीय संचालक श्री. विनय तोन्से म्हणाले, ‘एमएसएमई क्षेत्राच्या विकासाला चालना देण्यासाठी बँकेतर्फे अर्थव्यवस्थेतील एमएसएमई क्षेत्राची क्षमता आणि नावीन्यपूर्ण डिजिटल सुविधांची सांगड घातली जात आहे. एमएसएमई सहज- डिजिटल बिझनेस लोन्स फॉर इनव्हॉइस फायनान्सिंग ही सुविधा जीएसटी यंत्रणेचा भाग असलेल्या लघू एमएसई युनिट्सना एसबीआयच्या योनो बी वर डिजिटल मोडमध्ये ‘ऑन टॅप’ या लघुकालीन कर्ज सुविधेच्या मदतीने खेळत्या भांडवलाची गरज पूर्ण करेल.’

Breaking

“एच.डी.मांजरेकर उत्कृष्ट एन.सी.सी कॅडेट ट्रॉफी” वितरण कार्यक्रम संपन्न

मेजर एच.डी. मांजरेकरउत्कृष्ट एन.सी.सी.कॅडेट ट्रॉफी वितरणरक्तदान शिबिराचे आयोजन६१ रक्तदात्यांनी...

देशभक्तीपूर्ण वातावरणात ६४ वा गोवा मुक्ती दिन साजरा; मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडून राष्ट्रध्वजारोहण

‘ऑपरेशन विजय’, पिंटो व कुंकळ्ळी उठावांचा मुख्यमंत्र्यांकडून उल्लेख; पोलीस,...

नगरपरिषद, नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीकरिता संपूर्ण यंत्रणा सज्ज- जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

मतदारांना मतदान करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन पुणे, दि. १९: राज्य निवडणूक...
spot_imgspot_img